माझ्या पाठिशी मंत्र्यानं उभे राहावं ; किरण गोसावीचा व्हिडिओ व्हायरल

''प्रभाकर साईल (Prabhakar Sail) अन् त्याचे दोन्ही भाऊ यांचे सीडीआर रिपोर्ट, त्यांचे मोबाईल चॅट काढावेत, माझे मोबाईल चॅट काढा. मी कुठे बोललो आहे हे स्पष्ट होईल.''
kiran gosavi
kiran gosavisarkarnama

पुणे : आर्यन खान ड्रग्ज पार्टीतील पंच प्रभाकर साईल (Prabhakar Sail) याने किरण गोसावीवर (kiran gosavi) गंभीर आरोप केल्यानंतर आज किरण गोसावीने एक व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यावरील आरोप खोटे असल्याचे सांगितले. ''प्रभाकर साईल याचा सीडीआर रिपोर्ट तपासा, त्यातून कोणा किती पैसे घेतले हे स्पष्ट होईल,'' असेही गोसावी म्हणाला.

प्रभाकर साईलने जो व्हिडिओ व्हायरल केला आहे. त्याबाबत किरण गोसावी म्हणाला, ''प्रभाकर साईल जे आरोप करतो आहे. एवढे पैसे घेतले, तेवढे पैसे घेतले आहे. पण सॅम डिसुझासोबत संभाषण कुणाचे झाले आहे, किती पैसे कुणी घेतले, प्रभाकर साईलला पाच दिवसात काय ऑफर आल्या आहेत. हे त्यांच्या मोबाईलवरुन तुम्हाला स्पष्टपणे समजेल. माझी माध्यमांना एवढीच विनंती करतो प्रभाकर साईल आणि त्याचे दोन्ही भाऊ यांचे सीडीआर रिपोर्ट, त्यांचे मोबाईल चॅट काढावेत, माझे मोबाईल चॅट काढा. मी कुठे बोललो आहे हे स्पष्ट होईल.''

''आयात-निर्यात करण्याचा माझा व्यवसाय आहे. ज्यावेळी प्रभाकर माझ्यासोबत होता, पूर्वीची माझी काही चॅट असतील तेही तपावावे. दोन तारखेनंतरच्या त्यांच्या चॅट ओपन कराव्यात. कुणाचे संभाषण त्याने डिलिट केलं आहेत, ते डिलिट केलेलं संभाषणपण तपासावे, माझी एवढीच विनंती आहे. मुंबई पोलिसांनी त्यांची केस हातात घेतली असेल तर प्रथम त्यांच्यावर कारवाई करावी, कोणते मंत्री त्यांच्यामागे आहेत त्यांची माहिती काढावी, अशी विनंती किरण गोसावी याने मुंबई पोलिसांकडे केली.

kiran gosavi
'मी फसलो, वानखेडेंनी कोऱ्या कागदावर माझ्या सह्या घेतल्या!

''मी मराठी व्यक्ती असल्यामुळे माझ्याकडे सत्ताधारी पक्षातील किंवा विरोधी पक्षातील मंत्र्यानं उभं राहावं. मी जे सांगतो त्यावरुन मुंबई पोलिसांकडे अर्ज करावा. प्रभाकरचे फोन रेकॉर्ड तपासा. त्यामुळे तो जे जे आरोप करतो आहे. ते खोटे आहेत. प्रभाकर आणि त्यांच्या दोघा भावांनीच पैसे घेतले आहेत, असा आरोप किरण गोसावीने केला आहे.

kiran gosavi
क्रुझवरील पार्टीत कोणाची गर्लफ्रेंड होती?

किरण गोसावीला अखेर आज पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पुणे पोलिसांनी दावा केला आहे की, किरण गोसावीनं (Kiran Gosavi) सरेंडर केलेलं नसून आम्ही आमच्या इंटलिजेंसच्या आधारे त्याला अटक केली आहे. प्रभाकर साईल (Prabhakar Sail) आर्यन खानला ज्या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलं आहे, त्या मुंबई क्रूझ ड्रग्स (Mumbai Cruise Drug Case) प्रकरणातील पंच आहे. तर दुसरा पंच असलेल्या किरण गोसावीचा बॉडिगार्डही आहे. प्रभाकर साईलनं माध्यमांसमोर येत गौप्यस्फोट केल्यापासूनच किरण गोसावी फरार होता. तो लखनौमध्ये असल्याची माहिती मिळाली होती. याप्रकरणी पुणे पोलीस आयुक्त सकाळी 11 वाजता माध्यमांशी संवाद साधणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com