Prakash Ambedkar : शरद पवारांनी ठाकरेंना लिहिलेले ‘ते’ पत्र आयोगासमोर आणा! आंबेडकरांनी मुद्द्यालाच हात घातला...

Uddhav Thackeray’s Position During the Bhima Koregaon Riots : शरद पवार यांचे पत्र हे आयोगासमोर यायला हवं आणि शरद पवार यांचं म्हणणं देखील आयोगाने ऐकून घ्यायला हवं, अशी आमची मागणी होती, असे प्रकाश आंबेडकरांनी सांगितले.
Sharad Pawar, Prakash Ambedkar
Sharad Pawar, Prakash AmbedkarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी चौकशी आयोगाची सुनावणी आज पुण्यात पार पडली. या चौकशीदरम्यान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एका महत्वाच्या पत्राचा उल्लेख केला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाठवले होते.

आज भीमा कोरेगाव चौकशी आयोगाची सुनावणी पार पडली. या सुनावणीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. आंबेडकर म्हणाले, आजच्या सुनावणीसाठी आम्ही आयोगापुढे अर्ज दिला होता. त्यात मागणी केली होती की, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र दिले होते, त्यात त्यांनी 'भीमा कोरेगाव येथील हिंसाचार हा पूर्वनियोजित होता', अशा स्वरूपाचे ते पत्र होते.

Sharad Pawar, Prakash Ambedkar
Pahalgam Terror Attack : महाजनसाहेब, सर्वांना सुखरूप परत आणा… महाराष्ट्र वाट बघतोय!

या संदर्भात आता शरद पवार यांना आयोगाकडून पत्र देण्यात येईल. त्या पत्रामध्ये आयोग शरद पवार यांच्याकडे तत्कालीन मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्राबाबत विचारणा करेल. तसेच तारीख देऊन त्या तारखेपर्यंत ते पत्र सादर करण्यास सांगेल. हे पत्र आयोगासमोर आल्यानंतर आयोगाला आपला निकाल देण्यासाठी मदत होणार असल्याचे आंबेडकर म्हणाले.

शरद पवार यांचे पत्र हे आयोगासमोर यायला हवं आणि शरद पवार यांचं म्हणणं देखील आयोगाने ऐकून घ्यायला हवं, अशी आमची मागणी होती. त्यानुसार आयोगाने ही मागणी मान्य केले आहे. शरद पवार यांच्याकडे त्या संदर्भातील पत्र असेल तर भीमा कोरेगाव चौकशी आयोगासमोर ती बाजू आली पाहिजे, अशी आमची मागणी होती.

Sharad Pawar, Prakash Ambedkar
Pahalgam Terror Attack: अजितदादांचा ओमर अब्दुल्लांना फोन; महाराष्ट्रातील पर्यटकांना मदत पुरवा!

आयोगाने आमची बाजू मान्य केली आहे. त्या संदर्भातील निर्णय चौकशी आयोग घेणार आहे. लवकरच या संदर्भातील पुढील सुनावणी होईल, असंही आंबेडकर म्हणाले. दरम्यान, आंबेडकर यांच्याकडून सातत्याने या चौकशी आयोगाकडे विविध गोष्टींचा पाठपुरावा केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com