Prashant Jagtap News: काँग्रेसमध्ये पाऊल ठेवल्यानंतर 24 तासांच्या आतच प्रशांत जगतापांचं राष्ट्रवादी अन् शरद पवारांबाबत मोठं विधान

Congress Leader Prashant Jagtap News: पुणे राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते म्हणून प्रशांत जगताप यांची ओळख राहिली आहे.त्यांनी पुणे महानगरपालिकेत नगरसेवक आणि महापौर म्हणूनही काम करण्याचा मोठा अनुभव आहे. शरद पवार आणि अजित पवार यांचे विश्वासू शिलेदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते.
Prashant Jagtap Resigns
Prashant Jagtap ResignsSarkarnama
Published on
Updated on

Pune News: गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरासहच राज्याच्या राजकारणात प्रशांत जगताप यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपने पुणे,पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी एकनाथ शिंदेंसोबत युती करतानाच अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली. यानंतर अजित पवारांनी बेरजेचं राजकारण करताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीसमोर युतीचा प्रस्ताव ठेवला.

या प्रस्तावानंतर अजित पवार आणि शरद पवारांच्या काही प्रमुख नेत्यांमध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रित निवडणुका लढण्यासाठीच्या बैठकाही पार पडल्या. या सगळ्या घडामोडी न पटल्यानं अखेर माजी महापौर प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा देत पक्षाला सोडचिठ्ठी दिली. यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हा पक्षप्रवेश होऊन 24 तास उलटत नाही,तोच जगतापांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांबाबत मोठं विधान केलं आहे.

पुण्याचे माजी महापौर आणि नुकतेच काँग्रेसवासी झालेल्या प्रशांत जगताप यांनी शनिवारी (ता.27) माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, काँग्रेसमध्ये येताना आपण भावनिक होतो,कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मी साडे सव्वीस वर्षे होतो. तिथे काही कमर्शियल नातं नव्हतं.पवार साहेबांवर श्रद्धा होती. नातं आणि श्रद्धा आजपण आहे, जगताप यांनी सांगितलं आहे.

प्रशांत जगताप म्हणाले, या कार्यालयातील सर्व बदलले असले तरी काही नाती हृदयात असतात तसे शरद पवार (Sharad Pawar)कायम श्रद्धास्थानी राहतील. परंतू आता काँग्रेससोबत आलो आहे. काँग्रेसनं मला काही दिलं नाही, तरी आता येथेच राहणार आहे. कारण एक विचार म्हणून येथे आलो आहे. नाही तर अन्य पक्षांच्या देखील ऑफर होत्या, असेही जगताप यांनी म्हटले आहे.

Prashant Jagtap Resigns
Raigad murder Case : मंगेश काळोखे हत्याप्रकरण; गोगावलेंनी हत्येचं कारण सांगताच, संशयित राष्ट्रवादीच्या घारेंचा खळबळजनक दावा करणारा व्हिडिओ समोर... (Video)

आता राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी बरोबर येण्याची चर्चा होत आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस माझ्या काँग्रेस पक्षासोबत महाविकास आघाडीत येणार असेल तर आनंदच आहे, असेही प्रशांत जगताप यांनी म्हटलं आहे.

हे सगळं एखाद्या चित्रपटाप्रमाणे वाटतंय .सगळ्या स्क्रिप्ट,घटना 360 डिग्रीमध्ये फिरत आहे. या घटनांचा माझ्या मनावर कोणताही वेगळा परिणाम होणार नाही.मी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे. मी माझ्या हडपसर मतदारसंघातल्या,पुण्यातल्या किंवा महाराष्ट्रातल्या नागरिकांना किंवा पुरोगामी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना एक संदेश दिला आहे की, मी काँग्रेसबरोबर आलो असल्याचंही प्रशांत जगताप यांनी सांगितलं.

Prashant Jagtap Resigns
Aravalli Hills Controversy : देशभरातून संतापाची उसळली लाट, अखेर मोदी सरकार नरमलं; राजस्थानातील 'अरवली' वादाबाबत घेतला मोठा निर्णय

प्रशांत जगताप म्हणाले, तिथे आघाडीची वेगेळी अशी चर्चा सुरू होती,म्हणून मी पक्ष सोडला असं काही नाही. पुण्यात महाविकास आघाडीचं अस्तित्व टिकवण्यासाठी जर आमचा पूर्वाश्रमीचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोबत आला,तरी याचा आनंदच असणार आहे. फक्त महापालिका निवडणुकीसाठीचं आघाडीतील जागावाटपाबाबतचा अंतिम निर्णय हा सर्वस्वी आमचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे,बंटी पाटील आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा असणार आहे.

पुणे राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते म्हणून प्रशांत जगताप यांची ओळख राहिली आहे.त्यांनी पुणे महानगरपालिकेत नगरसेवक आणि महापौर म्हणूनही काम करण्याचा मोठा अनुभव आहे. शरद पवार आणि अजित पवार यांचे विश्वासू शिलेदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते.विरोधात असताना सत्ताधाऱ्यांविरोधात अतिशय आक्रमकपणे आंदोलनं करून त्यांना घाम फोडायचे.अगदी नीतीमूल्यांनी लढणारे नेते म्हणून त्यांची ओळख निर्माण केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com