Prashant Jagtap News : निमित्त आभार मेळाव्याचे अन् जगतापांनी रणशिंग फुंकले विधानसभेचे !

Pune Political News : बारामती, शिरूर लोकसभा मतदारसंघात ताकद लावत प्रशांत जगताप यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांची मने जिंकली. त्यानंतर हेच जगताप आता 'अॅक्शन मोड' वर आले आहेत. संघटनेमध्ये बळ भरण्यासाठी त्यांनी आता वेगवेगळे प्रयोग सुरू केले आहेत...
Chetan tupe, Prashant Jagtap
Chetan tupe, Prashant JagtapSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे, बारामती, शिरूरसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गटाचे) उमेदवार लोकसभेच्या निवडणुकीत घवघवीत मतांनी विजयी होतील, असा विश्वास व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मतदानाच्या दिवशीच खासदार सुप्रिया सुळे यांच्या समवेत सेलिब्रेशन देखील केले. त्यापाठोपाठ याच जगताप यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात पक्षासाठी झटलेल्या कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यासाठी विशेष कार्यक्रम घेऊन येणाऱ्या काळातील निवडणुकीसाठी आम्ही सज्ज असल्याचा मेसेज दिला. विशेषत: पुढील काही महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवत जगताप यांनी या कार्यक्रमांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये प्राण फुंकल्याचे बोलले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बरोबर राहणे प्रशांत जगताप यांनी पसंत केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली त्यावेळी जगताप हे पुणे शहराध्यक्ष म्हणून जबाबदारी संभाळत होते. त्यानंतर ते शरदचंद्र पवार गटात गेले. शरद पवार यांनी त्यांना शहराध्यक्षपदी कायम ठेवले. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत प्रशांत जगताप यांनी बारामती, शिरूर या लोकसभा मतदारसंघाबरोबर पुणे लोकसभेसाठी देखील जोरदार ताकद लावली.

बारामती, शिरूरमध्ये ताकद लावत जगताप यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांची मने जिंकल्यानंतर हेच जगताप आता 'अॅक्शन मोड' वर आले आहेत. संघटनेमध्ये बळ भरण्यासाठी त्यांनी आता वेगवेगळे प्रयोग सुरू केले आहेत. निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करून त्यांच्याशी संवाद साधणे हा त्याचाच एक भाग होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Chetan tupe, Prashant Jagtap
Praful Patel News : प्रफुल पटेल यांना 24 तासांचा अल्टिमेटम नाहीतर संभाजी ब्रिगेड देणार दणका...

दहा महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांना बरोबर घेत राज्यात सत्ताधारी असलेल्या एकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस सरकारला जाहीर पाठींबा दिला. त्यानंतर सत्तेत सहभागी होत अजित पवार उपमुख्यमंत्री देखील झाले. पक्षाचा ताबा निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्याकडे देत काही अटींची पुर्तता करून पक्षाचे घड्याळ चिन्ह देखील त्यांना वापरण्याची मान्यता दिली. त्यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या नावाने दुसरा पक्ष काढून 'तुतारी वाजविणारा माणुस' हे पक्षाचे नवे चिन्ह घेत लोकसभा निवडणूका लढविल्या. पक्षात फुट पडल्यानंतर देखील महाविकास आघाडीत सहभागी झालेल्या पक्षांच्या माध्यमातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटाने लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांना सळो कि पळो करून सोडले.

लोकसभेच्या निवडणुकीसाठी बारामती (Baramati) लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाकडून खासदार सुप्रिया सुळे, शिरूर मधून खासदार अमोल कोल्हे निवडणुकीच्या रिंगणात होते. शिरूरमध्ये समावेश असलेल्या हडपसर विधानसभेची जबाबदारी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी घेतली होती. बारामती, पुणे लोकसभा मतदारसंघामध्येही चांगला संवाद ठेवत जगताप यांनी बेस्ट परफॉर्मन्स दिला. निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मदतीने त्यांनी एकाकी किल्ला लढविला, याचा प्रत्यय लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांना आला.

Chetan tupe, Prashant Jagtap
Pune BJP News : 'सबका हिसाब होगा'; भाजप पदाधिकाऱ्यांच्या कामाचं होणार पोस्टमार्टेम ...

शहराध्यक्ष पदावर काम करणारे प्रशांत जगताप हे हडपसर मधून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहेत. हडपसरमधून प्रतिनिधीत्व करणारे विद्यमान आमदार चेतन तुपे हे अजित पवार यांच्या बरोबर आहेत. राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीनंतर जगताप यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेत विधानसभा लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी शरद पवार (Sharad Pawar) यांनी त्यांना तयारी लागा, अशा सूचना देखील दिलेल्या आहेत. लोकसभा निवडणुकीनिमित्त हडपसर भागात झालेल्या जाहीर सभांमध्ये जयंत पाटील यांनीही जगताप हेच पुढील उमेदवार असतील, असे सुतोवाच केलेले आहेत. त्यामुळे जगताप यांनी या मतदारसंघात जनसंपर्क वाढविला आहे.

Chetan tupe, Prashant Jagtap
Lok Sabha election 2024 : धंगेकर 40 हजार, तर सुळे अन् कोल्हेंचा अडीच लाखांच्या मताधिक्याने विजय! जगतापांना कॉन्फिडन्स...

लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीमध्ये फूट पडूनही चांगले काम झाले आहे. त्यामुळे हा निकाल सकारात्मक लागेल. शिरूरमधून डॉ.कोल्हे निवडून येतील असा विश्वास कार्यकर्त्यांना आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळाल्यास जगताप यांना विजयी करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे. हीच बाब लक्षात घेत निवडणूक संपल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी जगताप यांनी हा आभार मेळावा घेतला होता. वानवडी येथील महात्मा फुले सभागृहात संगीत रजनीचा कार्यक्रम जगताप यांनी आयोजित करून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

Chetan tupe, Prashant Jagtap
Jalna Loksabha Constituency : 'दोस्त दोस्त ना रहा...' अब्दुल सत्तारांनी दानवेंना चकवा दिल्याची चर्चा !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com