Prashant Jagtap On Amit Shah : तडीपार अमित शाह यांना पुण्याच्या जगतापांनी, 'असं काही सुनावलं...'

Prashant Jagtap strong response to Amit Shah criticism of Sharad Pawar : शरद पवार यांच्यावर पुण्यात येऊन भाजपचे अमित शाह यांनी टिका केली होती. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुण्याची शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी अमित शाह यांना त्यांच्या तडीपारीचा आठवण करून दिली.
Prashant Jagtap On Amit Shah
Prashant Jagtap On Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुण्यामधील भाजपच्या अधिवेशनामध्ये गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. शरद पवार भ्रष्टाचारांचे प्रमुख आहेत, असं अमित शाह यांनी टिका करताना म्हटले. अमित शाह यांची टिका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली असून यानंतर शरद पवार गटाकडून भाजप आणि अमित शाह यांच्यावर जोरदार प्रतिहल्ले सुरू झालेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केला. जगताप म्हणाले, "भाजपचे (BJP) लोक पुण्यात येऊन गेले, त्यांनी काय विकास केला हे सांगण्यापेक्षा पवार साहेबांवर टिका करत बसले. महाराष्ट्र बातम्यांमध्ये यायचं असेल, तर पवार साहेबांवर टिका करणे हा त्यांचा एककल्ली कार्यक्रम आहे".

Prashant Jagtap On Amit Shah
BJP State Conclave in Pune: भाजप निष्क्रीय आमदारांना दाखवणार घरचा रस्ता; शहांच्या हाती 'प्रगती पुस्तक'

एका केसमध्ये गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) तडीपार होते. त्यांनी पवार साहेबांना भ्रष्टाचाराचे सरदार म्हणणे हे बालिशपणाचे आहेच पण, आपली बुद्धी किती आहे हे दाखवून दिले आहे. तुम्ही तडीपार झाल्यानंतर महाराष्ट्रात का आश्रय घ्यावा वाटलं? नेमकी तुम्ही कोणत्या कारणासाठी तडीपार होता, हे तुम्ही देशातील जनतेला सांगावा, असं आव्हान जगताप यांनी अमित शाह यांना दिलं.

Prashant Jagtap On Amit Shah
Prashant Jagtap News : शरद पवारांवरच्या टीकेवरून प्रशांत जगतापांनी लंडनहून येताच अमित शहांवर बाण सोडला!

पवार साहेबांचे योगदान नसेल, तर अमित शाह यांचं काय योगदान आहे हे त्यांनी सांगावं. शरद पवार भ्रष्टाचार टोळीचे प्रमुख असतील, तर एखादा टोळीचा प्रमुख असेल, मग त्या टोळीचे सदस्य तुमच्याकडे आहेत, ते साधू संत आहेत का? पवार भ्रष्टाचाराचे सरदार असतील, तर मोदी सरकारने पद्मविभूषण का दिले? असे सवाल देखील जगताप यांनी उपस्थित केला.

जगताप म्हणाले, "केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना खुलं चॅलेंज आहे, त्यांनी हिशोब दाखवावाच. आगामी काळात आम्ही नगरसेवकाचे पैसे खाऊन आमदाराचा निधी कसा वापरला, याचे पुरावे घेऊन आम्ही समोर येऊन भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांचा मुखवटा फाडणार आहोत". 9 ऑगस्ट क्रांती दिनापासून भाजपचा मुखवटा फडण्याचं काम करू, असा इशारा जगताप यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com