प्रशांत जगताप म्हणाले; हा बंद निष्ठुर पंतप्रधानांच्या विरोधात.

लखीमपूर हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्ष व संघटनांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला पुण्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला.
  Prashant Jagtap
Prashant Jagtap Sarkarnama
Published on
Updated on

सरकारनामा ब्यूरो

पुणे : सेलिब्रिटींसाठी ट्विट करणाऱ्या पंतप्रधांनाना लखीमपूर येथील शेतकऱ्यांसाठी दु:ख करायला वेळ नाही. त्यामुळे आजचा बंद खऱ्या अर्थाने निष्ठुर पंतप्रधनांच्या विरोधात आहे, अशी टीका पुण्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज केली.

लखीमपूर हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्ष व संघटनांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला पुण्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला.पुण्याच्या मध्यवर्ती भागात संपूर्ण बंद पाळण्यात आला. हॉटेल, पीएमटी, रिक्षा या सार्वजनिक सेवा पूर्णपणे बंद होत्या.उपनगरांमधील बहुतांश व्यवहार सरळित होते.मुबंई तसेच बाहेर गावावरून येणारी सर्व वाहतूक सुरळित होती.

  Prashant Jagtap
मनसेचे अमेय खोपकर म्हणतात; सुरु राहू दे तुमचं राजकारण बंद नको चित्रीकरण !

पुण्यातल्या व्यापाऱ्यांनी बंदला पाठिंबा दिला आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी महासंघाने रविवारी जाहीर केला होता. त्याप्रमाणे मध्यवर्ती भागातील सर्व व्यवहार आज सकाळी बंद होते.दुपारनंतर सर्व दुकाने उघडण्यात येणार असल्याचे व्यापारी तसेच हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले.

या संदर्भात बोलताना राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, ‘‘ बंदला सर्व व्यापारी, व्यावसायिकांनी पाठिंबा दिला असून शेतकऱ्यांप्रती केंद्र सरकारच्या निष्ठुर भूमिकेबद्दल सामान्य माणसाच्या मनात राग आहे.सोलिब्रिटींसाठी ट्विट करून अश्रू ढाळणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखीमपूरला शेतकऱ्यांना चिरडल्यानंतर कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. या घटनेला आठ दिवस उलटून गेल्यानंतर मंत्री पूत्र असलेल्या आशिष मिश्रा याला अटक करण्यात आली आहे. निष्पाप शेतकऱ्यांचे जीव घेणाऱ्या आरोपींच्या विरोधात कडक कारवाई झाली पाहजे.’’

  Prashant Jagtap
तळजाई जैववैविधता प्रकल्पाला मनसेचा विरोध; ठाकरे उतरणार मैदानात

दरम्यान, या बंदचा एक भाग म्हणून पुण्यातील महाविकास आघाडीच्या घटक पक्ष व संघटनांनी निषेध सभा आयोजित करण्यात आल्या आहेत.शहरात वेगवेगळ्या ठिकाणी या सभा होणार असून मुख्य सभा जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सकाळी साडेअकरा वाजता होणार आहे.

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com