ACB Complaint : एकनाथ शिंदेंच्या मंत्र्याचा 'प्रताप', कामगार सभेचा 'एसीबी'कडे अर्ज; अधिकारीही अडचणीत?

Pratap Sarnaik ACB Kamgar Sabha : 'रॅपिडो'वर सरनाईक मंत्री असलेल्या परिवहन खात्याकडून मागील तीन वर्षात विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तरीसुद्ध या कंपनीकडून स्पाॅन्सशिप घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
Eknath Shinde-Pratap Sarnaik
Eknath Shinde-Pratap SarnaikSarkarnama
Published on
Updated on

Pratap Sarnaik News : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांच्या खोलीत पैशाची बॅग दिसत असल्याने चर्चेत आले होते. त्यानंतर मंत्री भरत गोगावले यांनी घातलेल्या आघोरी पुजेचा व्हिडिओ समोर आला होता. आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यामुळे शिंदेंचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. सरनाईक यांनी परवानगी नसताना प्रवासी वाहतूक करणाऱ्या रॅपिडो कंपनीवर कारवाई केली होती. त्याच कंपनीकडून त्यांच्या मुलाने प्रो गोविंद लीगची स्पाॅनरशिप घेतली असल्याचे समोर आले आहे.

सरनाईक यांनी ज्या कंपनीवर कारवाई केली तिच्याकडून स्पाॅनरशिप घेतल्याने टीका होत असताना कामगार सभेचे अध्यक्ष केशव क्षीरसागर यांनी थेट एससीबीकडे तक्रार अर्ज करत मंत्री सरनाईक आणि अप्पर परिवहन आयुक्त भरत कळसकर यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. सर्व भ्रष्टाचाराचे मुख्य सुत्रधार कळसकर असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.

'रॅपिडो'वर सरनाईक मंत्री असलेल्या परिवहन खात्याकडून मागील तीन वर्षात विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तरीसुद्दा सरनाईक यांच्या मुलाने इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला गोविंदा लीगच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पैसा रॅपिडो करून घेतला. हा पदाचा गैरवापर आहे. आणि हेच इतर ओला व उबर सारख्या हजारो डॉलरची फंडिंग असणारा कंपन्यांबाबत सुद्धा घडत असणार यात शंका नाही, ज्यामुळे या सर्व कंपन्या सर्व कायदे धाब्यावर बसून व्यवसाय करत आहेत कारण त्यांना अधिकाऱ्यांकडून अभय मिळालेले आहे, असा दावा क्षीरसागर यांनी एसीबी ला दिलेल्या अर्जात केला आहे.

Eknath Shinde-Pratap Sarnaik
Satej Patil tractor GPS opposition : देशातील ट्रॅक्टरला लागणार जीपीएस, ब्लॅक बॉक्स; कोल्हापुरातून सतेज पाटलांनी विरोध करत फोडले बिंग

प्रताप सरनाईक काय म्हणाले?

प्रताप सरनाईक यांच्यावर होत असलेल्या आरोपाविषयी त्यांना विचारले असता ते म्हणाले, स्पाॅन्सरशिप आत्ता घेतलेली नाही. तीन वर्षांपासून ही स्पाॅन्सरशिप आहे. तेव्हा मी परिवहन खात्याचा मंत्री देखील नव्हतो. विशेष म्हणजे मी मंत्री असताना रॅपिडोवर कारवाई केली आहे. तसेच या खेळाला पुढे करण्यासाठी फक्त रॅपिडो नाही तर 5-25 एजन्सी देखील आहेत.

Eknath Shinde-Pratap Sarnaik
Sujay Vikhe On Balasaheb Thorat : 'पळाला, काट्यात लपला, काटे काढत बसला असेल, पण याच पोरा-बाळांनी पाडलं'; विखे पाटलांनी हिशोब काढला!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com