Indapur News: इंदापूरच्या राजकारणात भाजपची ताकद पुन्हा वाढली; एकेकाळी शरद पवारांची ताकद असलेल्या नेत्यानं घेतलं कमळ हाती

Indapur BJP News : गेल्या काही दिवसांपासून प्रवीण माने हे भाजपत जाणार, अशी चर्चा रंंगली होती. मधल्या काळात त्यांच्या भाजप नेत्यांशी गाठीभेटी होत होत्या, त्यामुळे ते भाजपमध्ये जातील, असे संकेत मिळत होते.
Pravin Mane Join bjp .jpg
Pravin Mane Join bjp .jpgSarkarnama
Published on
Updated on

Indapur News : इंदापूरच्या राजकारणातलं मोठं प्रस्थ म्हणून ओळख असलेल्या पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. माने हे एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. पण विधानसभेच्या 2024 च्या निवडणुकीपासून ते पवारांपासून दुरावले होते. मात्र,आता माने यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपची इंदापुरात चांगलीच ताकद वाढली आहे.

जिल्हा परिषदेचे माजी सभापती दशरथ माने यांचे चिरंजीव पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा होती. इंदापूरच्या राजकारणात महत्वपूर्ण भूमिकेत असणाऱ्या मानेंनी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतल्यानं तालुक्यात पक्षाला मुरब्बी चेहरा मिळाला आहे.

प्रवीण माने यांचा बुधवारी (ता. 02 जुलै) प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईतील पक्षाच्या मुख्यालयात भाजप (BJP) प्रवेश पार पडला आहे. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार राहुल कुल, कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थित होते. यावेळी इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील,भाजपचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब चवरे यांच्यासह अनेक कार्यकर्तेही हजर होते.

यावेळी प्रवीण माने यांनी सांगितले की, देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी शक्तिशाली भारत उभा करत आहेत. पंतप्रधानांच्या विचारांनी प्रेरित होवून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकासामध्ये अग्रेसर आहे. इंदापूर तालुक्याची भौगलिक परिस्थिती चांगली आहे.

Pravin Mane Join bjp .jpg
Narayan Rane: नारायण राणेंचं सर्वात मोठं विधान; म्हणाले, तर राज ठाकरे शिवसेनेचे प्रमुख होणार अन् उद्धव...!

नीरा नदी, भीमा नदी तालुक्यातुन वाहत असून महामार्ग, रेल्वे स्टेशन आहे. सोनाईच्या माध्यमातून तालुक्यातील 25 हजार युवकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करुन दिला. जिल्हा परिषदेचा सभापती असताना 300 कोटी रुपयांचा विकासनिधी आणून तालुक्याचा विकास केला होता.

2024 ची विधानसभा निवडणूक अपक्ष लढलो असून 38 हजारांपेक्षा जास्त मते मिळाली. तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी भाजपमध्ये प्रवेश केला असून पक्ष देईल ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार आहे. भाजप पक्ष तालुक्यातील घरोघरी पोहचवणार असून जनतेसाठी 24 तास काम करणार असल्याचे सांगितले.

Pravin Mane Join bjp .jpg
BMC Election Predictions : ठाकरे बंधू एकत्र येऊ नये हाच अट्टहास... निकाल महायुतीला धडकी भरवू शकतो!

सोनाई उद्योग समूहाचे सर्वेसर्वा दशरथ माने आणि प्रवीण माने हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जात होते. विधानसभा निवडणुकीत ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छूक होते. मात्र, पवारांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना इंदापुरात उमेदवारी दिली, त्यामुळे माने यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. तेव्हापासून माने यांच्या राजकीय वाटचालीबाबत उत्सुकता होती.

गेल्या काही दिवसांपासून प्रवीण माने हे भाजपत जाणार, अशी चर्चा रंंगली होती. मधल्या काळात त्यांच्या भाजप नेत्यांशी गाठीभेटी होत होत्या, त्यामुळे ते भाजपमध्ये जातील, असे संकेत मिळत होते. त्यानुसार प्रवीण माने यांनी भाजपात जाण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला होता.त्यांच्या या भाजप एन्ट्रीमुळे आगामी काळात इंदापूरच्या राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com