BMC Election Predictions : ठाकरे बंधू एकत्र येऊ नये हाच अट्टहास... निकाल महायुतीला धडकी भरवू शकतो!

Mumbai BMC Elections 2025 News : राज्यभरातील मनसे व उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले आहे. तर दुसरीकडे ठाकरे बंधू ५ जुलैला एकत्र येत विजयोत्सव साजरा करणार आहेत.
devendra fadnavis | eknath shinde | raj thackeray | uddhav thackeray
devendra fadnavis | eknath shinde | raj thackeray | uddhav thackeraysarkaranama
Published on
Updated on

Mumbai News : हिंदी सक्तीच्या विरोधात राज व उद्धव ठाकरे बंधू एकत्र आले. राज्य सरकारच्या त्या धोरणाविरोधात एकत्र येत मोर्चा काढण्याचा निर्धार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने व मनसेने केला होता. मात्र, महायुती सरकारने जनरेट्यापुढे नमते घेत होंडा हिंदी सक्तीच्या विरोधातील दोन्ही जीआर रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच राज्यभरातील मनसे व उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले आहे. तर दुसरीकडे ठाकरे बंधू 5 जुलैला एकत्र येत विजयोत्सव साजरा करणार आहेत.

दोन्ही भाऊ एकत्र राहिल्यास त्याचा परिणाम आगामी काळात होत असलेल्या मुंबई पालिका निवडणुकीच्या निमित्त्ताने चित्र बदलण्याची शक्यता आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते ठाकरे बंधू एकत्र येण्याचा सर्वाधिक फटका येत्या काळात भाजपला बसणार आहे. मात्र, स्थानी स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला स्थानिक पातळीवर वेगवेगळी समीकरणे असतात त्यामुळे येत्या काळात सर्वच पक्षांचा कस लागणार आहे.

devendra fadnavis | eknath shinde | raj thackeray | uddhav thackeray
Uddhav-Raj Thackery: तब्बल 20 वर्षानंतर ठाकरेंच्या वाघांची एकाच व्यासपीठावरुन होणार गर्जना! 2005 मध्ये नेमकं काय घडलं होतं?

गेल्या चार महिन्यापासून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना-मनसे युतीबाबत चर्चा सुरु आहेत. लवकरच ठाकरे बंधू एकत्र येतील, अशा चर्चा रंगल्या आहेत. त्यातच हिंदी सक्तीच्या विरोधात मोर्चा काढण्याच्या निमित्ताने ५ जुलै रोजी राज व उद्धव ठाकरे बंधू एकत्र येणार होते. मात्र, त्यापूर्वीच राज्य सरकारने हिंदी सक्तीचे दोन जीआर मागे घेतले. त्यामुळे मोर्चा रद्द झाला आहे. दुसरीकडे मोर्चाच्यानिमित्ताने दोन्ही पक्षातील नेत्यामध्ये चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात हे दोन पक्ष एकत्रित आले तर काय होणार याची चाचपणी सर्वच राजकीय पक्षाने सुरु केली आहे.

devendra fadnavis | eknath shinde | raj thackeray | uddhav thackeray
Raj Thackrey Politics: नाशिकमध्ये मनेसेने केली शिवसेनेची परतफेड, राज आणि उद्धव ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनोमिलनाचा नवा अध्याय...

एकीकडे हे दोन्ही भाऊ एकत्र आल्याचे काही राजकीय पक्षाने स्वागत केले आहे. तर हिंदी सक्तीच्या विरोधात होणाऱ्या मोर्चामध्ये काँग्रेस (Congress) व शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सहभागी होण्याची तयारी दर्शवली होती. त्यामुळे दोघा भावांनी एकत्र यावे, अशी सर्वांची इच्छा असली तरी एकत्र येत नव्हते. मात्र, आता या निमित्ताने समीकरण जुळले आहे.

devendra fadnavis | eknath shinde | raj thackeray | uddhav thackeray
Raj-Uddhav Thackeray : अखेर शिक्कामोर्तब! राज-उद्धव ठाकरेंचे पहिल्यांदाच संयुक्त निवेदन; म्हणाले, गुलाल उधळत या…

येत्या काळात हे दोन्ही भाऊ एकत्र आले तर मराठी मतांचं विभाजन टळणार आहे. मराठी मतदार विशेषतः मुंबई व उपनगरांत विभागले गेले आहेत. जर ठाकरे गट व मनसे एकत्र आले, तर हे मत एकत्र येऊ शकतात. त्याचा मोठया प्रमाणात फायदा होण्याची शक्यता आहे. हिंदी सक्तीच्या मोर्चाच्या निमित्ताने एकत्रित आलेल्या या दोन्ही पक्षाचे सूर जुळले आहेत. त्याचा फायदा त्यांना येत्या काळात होणार आहे.

devendra fadnavis | eknath shinde | raj thackeray | uddhav thackeray
Shivsena UBT: पहिल्याच पत्रकार परिषदेत नवे जिल्हाप्रमुख इंगवलेंचा थेट पालकमंत्र्यांवर वार, जुगार, मटकेवाले मुख्यमंत्र्यांना..?

उद्धव ठाकरेंची कसोटी पाहणारा काळ

शिवसेनेचा परंपरागत मतदार वर्ग ठाकरे नावाशी भावनिकरित्या जोडलेला आहे. त्यासोबतच मुंबईमध्ये मराठी मतदाराची मोठी ताकद आहे. ही ताकद मुंबईत अजूनही शिल्लक आहे. त्याचा फायदा येत्या काळात दोन्ही ठाकरे बंधूंना होणार आहे. मराठी व्होट बँक टिकवून ठेवण्यासाठी उद्धव ठाकरेंची कसोटी लागणार आहे. दोन्ही भाऊ एकत्र येऊ नये यासाठी दोन्ही ठाकरे बंधूंना अनेक अडथळयांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे येत्या काळात दोघेही काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

devendra fadnavis | eknath shinde | raj thackeray | uddhav thackeray
Congress exit plan : ठाकरे बंधूंच्या टाळीने काँग्रेस अस्वस्थ: महाविकास आघाडीतील एक्झिट प्लॅन ठरला; मुंबईतून पहिली घोषणा?

भाजपविरोधी वातावरणाचा होऊ शकतो फायदा

राज्यातील महायुती सरकारला सत्तेत येऊन जवळपास आठ महिन्याचा कालावधी झाला आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारविरुद्ध असलेल्या असंतोषाचा फायदा एकसंध विरोधकांना मिळू शकतो. त्यामुळे विरोधकांनी एकत्रित येऊन रणनीती आखली तर निश्चितच फायदा होण्याची शक्यता आहे. हिंदी सक्तीवरून मराठी मते ठाकरे बंधूंच्या पारड्यात गेली तर भाजपला मोठा फाटका बसण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली.

devendra fadnavis | eknath shinde | raj thackeray | uddhav thackeray
BJP Politics : BJP ने जाहीर केले 9 राज्यांचे कारभारी! 20 प्रदेशाध्यक्ष बदलणार

राजकीय समीकरण बदलणार

आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट), आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्रित निवडणूक लढणार की स्वबळ अजमवणार यावर बरेच काही चित्र अवलंबून आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे येत्या काळात मनसेला सोबत घेणार की महाविकास आघाडीला सोबत घेणार यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे.

devendra fadnavis | eknath shinde | raj thackeray | uddhav thackeray
Maharashtra BJP: अखेर प्रतीक्षा संपली! बावनकुळेंनंतर भाजपला नवा धडाकेबाज प्रदेशाध्यक्ष मिळाला

ठाकरे बंधू एकत्र येऊ नयेत यासाठी भाजप व एकनाथ शिंदे प्रयत्नशील आहेत. हे दोन्ही भाऊ एकत्र आले तर त्याचा फटका महायुतीला बसणार आहे. विशेषतः शिंदेंच्या शिवसेनेचे नुकसान होणार आहे. त्यामुळे दोघे एकत्र येऊ नयेत यासाठी प्रयत्न सुरु आहेत. हिंदी सक्तीच्या निर्णयाला विरोध केल्याचा फायदा ठाकरे बंधूंना होणार आहे. तर हिंदी सक्तीमुळे हिंदी भाषिक मताचा फायदा महायुतीला होणार आहे. दुसरीकडे राज ठाकरेंची मनसे महायुतीसोबत नसल्याने बिहार निवडणुकीत फायदा होणार आहे. दुसरीकडे या निवडणुकीत उद्धव ठाकरेंची भूमिका महत्वाची असल्याने त्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले असल्याचे राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी सांगितले.

devendra fadnavis | eknath shinde | raj thackeray | uddhav thackeray
BJP Vs Shivsena : गोगावलेंचा राणेंवर वार; तळकोकणात वणवा; भाजप नेत्यांचा आक्रमक पवित्रा, थेट युतीवरच घाव

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com