Laxman Jagtap : दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबाचे मोदी, शाहांकडून सांत्वन

Narendra Modi : लक्ष्मण जगतापजी जमीनसे जुडे नेता थे, पंतप्रधान मोदींचा शोकसंदेश
Narendra Modi and Laxman Jagtap
Narendra Modi and Laxman JagtapSarkarnama

पिंपरी : चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे ३ जानेवारीला दीर्घ आजाराने निधन झाले. त्यानंतर जगताप कुटुंबाच्या सांत्वनासाठी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची त्यांच्या घरी रीघ लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनीही जगताप कुटुंबाला पत्राव्दारे नुकताच (ता.९) धीर दिला.

लक्ष्मण जगतापजी जमीनसे जुडे नेता थे, असे मोदींनी आपल्या या शोकसंदेश पत्रात म्हटले आहे. ते आपल्या परिवारासाठी मजबूत आधार आणि प्रेरणास्त्रोत होते. ते आज या जगात नसले, तरी त्यांच्या आठवणी आणि त्यांची जीवनमूल्ये कायम राहतील, अशा भावना पंतप्रधानांनी व्यक्त केल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी देखील जगताप कुटुंबियांना पत्र पाठवून सांत्वन केले आहे.

Narendra Modi and Laxman Jagtap
Pandharpur News : उसाच्या काटामारीतून साखर कारखानदार दरवर्षी ४५०० कोटींचा दरोडा घालतात : राजू शेट्टींचा आरोप

आ. जगतापांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर अतीव दुःख झाले. माझ्या संवेदना जगताप कुटुंबियांसोबत आहेत. सहज आणि सरळ व्यक्तिमत्त्वाचे स्व.आ.जगताप हे जमीनीसोबत जोडलेले नेते होते. ते लोककल्याणासाठी सदैव समर्पित राहिले.

पुणे आणि आसपासच्या परिसराच्या विकासात त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. समाजासाठी केलेल्या निःस्वार्थ सेवेसाठी लोक त्यांना नेहमीच स्मरणात ठेवतील. त्यांच्या निधनाने भाजप आणि समाजाची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे, असे मोदींनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

Narendra Modi and Laxman Jagtap
Pimpri-Chinchwad : देशातील सिटी सेंटर सोडून पिंपरी पालिका आयुक्त निघाले दुबईचे सेंटर पहायला

दरम्यान, उद्योगनगरीतील सर्व राजकीय पक्षांच्यावतीने स्व.आ.जगतापांना आज (ता.१४) सायंकाळी एकत्रित श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar,) आऱोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, मुंबई (Mumbai) काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap), माजी राज्यमंत्री व आरपीआयचे (आठवले गट) राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, मनसेचे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) आदी या सर्वपक्षीय शोकसभेला उपस्थित राहणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com