Pune Election News : भाजपने काही महिन्यांपूर्वी निवडणुकीत पारदर्शकता आणण्यासाठी 'इलेक्टोरल बाँड' (निवडणूक रोखे योजना) (electoral bond) चा कायदा केला. हा कायदा इतका चुकीचा होता. हा कायदा मंजूर होताना काँग्रेस पक्षासह इतर विरोधी पक्षांनी लोकसभेत आणि राज्यसभेत त्याचा कडाडून विरोध केला होता. मात्र, पार्श्ववी बहुमताच्या आधारावर भाजपने (BJP) हा कायदा मंजूर केला. यामध्ये पारदर्शकता नाही. जी काही माहिती मिळणार आहे ती केंद्र सरकारलाच मिळणार आहे असं, या कायद्यात म्हणलं होतं. Prithviraj Chavan Latest News
आता आमच्या सुदैवाने सुप्रीम कोर्टाने यात कडक भूमिका घेतली आहे. निवडणूक रोख्यांचा कायदा हा बेकायदेशीर आहे. घटनाबाह्य आहे. हा कायदा रद्द केला आहे आणि या कायद्याच्या माध्यमातून 2017 पासून जी वसुली केली आहे, त्याची सर्वच्या सर्व माहिती प्रसिद्ध केली पाहिजे, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. मोदी सरकार (Modi Government) लोकशाही पूर्णपणे बुडवून हुकूमशाहीकडे देशाची वाटचाल करत असल्याची टीका माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी केली.
लॉटरी किंगकडून 1300 कोटी रुपयांची देणगी घेऊन नरेंद्र मोदी सरकारने या देशांमध्ये लॉटरीला, जुगाराला अधिकृत परवानगी दिली आहे. युवकांना तरुणांना रोजगार देणे काही मोदी सरकारला जमत नाही. मात्र, आता मोदी सरकार सांगते तुम्ही जुगार खेळा लॉटरी खेळा, अशी टीका माजी मुख्यमंत्री चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केली. निवडणुकीसाठी राजकीय देणगी वसूल करत मोदी सरकारने देशात जुगार, लॉटरी सुरू केली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
ईडी, सीबीआय यांचा वापर करून धाडी टाकायच्या आणि संबंधित कंपन्यांकडून चार-पाच दिवसांत निवडणुकी रोख्यासाठी देणग्या घ्यायच्या असे प्रकार आता समोर आले आहेत. 'जगातलं सर्वात मोठं खंडणी वसुलीचा रॅकेट हे मोदी सरकार चालवत होतं' हे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे उघड झालं आहे.
लोकांनीही निवडणूक आता हातात घेण्याची गरज आहे. चुकीच्या मार्गाने काम करत हुकूमशाही पद्धतीने मनमानी करणाऱ्यांना आता मतदारांनी धडा शिकवला पाहिजे, असे आवाहन पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. लोकशाही (Democracy) जिवंत राहण्यासाठी आता सर्वांनीच याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे.
पुणे लोकसभेसाठी आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना उमेदवारी मिळाल्यानंतर काँग्रेसमधील काही पदाधिकारी नाराज झाले आहेत. त्यांनी आपली नाराजी व्यक्त करत पक्षावर टीकेची झोड उठविली आहे. याबाबत पृथ्वीराज चव्हाण यांना विचारले असता, ते म्हणाले, कोणीही नाराज नाही. इच्छुक अनेक असतात मात्र शेवटी उमेदवारी एकालाच मिळते. राज्याच्या पातळीवर सर्व गोष्टींची पाहणी करून त्यानंतरच उमेदवारी देण्यात आली आहे. विजयाची खात्री असल्याने त्यांना ही उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपचे नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे बारामती लोकसभा मतदारसंघात गेले होते. त्यावेळी शरद पवार यांचा पराभव आम्हाला करायचा आहे? असे म्हणत ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल त्यांनी काही वक्तव्ये केली. या प्रश्नावर बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, नशीब आमचे बारामतीत (Baramati) जाऊन चंद्रकांत पाटील ' हू इज शरद पवार' म्हटले नाहीत.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.