मालमत्ताकर थकबाकीदारांनो सावधान.. तुमची मोटार,TV, फ्रीजची होऊ शकते जप्ती!

PCMC : पालिकेची मिळकतकराची 583 कोटी रुपयांची थकबाकी आहे.
PCMC News Latest News
PCMC News Latest NewsSarkarnama

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे या आर्थिक वर्षात (२०२२-२३) एक हजार कोटी रुपयांचा मिळकतकर वसुलीचे लक्ष्य आहे. त्यासाठी पालिका प्रशासन पुढील आठवड्यापासून मोठ्या थकबाकीदारांचे टीव्ही, फ्रीज, मोटार जप्त करणार आहेत. महापालिकेच्या करसंकलन विभागाचे प्रमुख सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांनी आज (ता.९ नोव्हेंबर) `सरकारनामा`ला ही माहिती दिली. (PCMC News Latest News)

पालिकेची मिळकतकराची 583 कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यातील आठ हजार ७९१ जणांकडे एक लाखांपेक्षा अधिक रकमेची ती आहे. त्यांच्याकडे एकूण २१६ कोटी कर थकित आहेत. तो वसूल करण्यासाठी या एक लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकीदारांच्या मोटारी, टीव्ही, फ्रिजसारख्या लक्झरी वस्तू जप्त करण्याची कारवाई पुढील आठवड्यापासून पालिकेचा करसंकलन विभाग सुरु करणार आहे.

त्यापूर्वी त्यांना नोटीस देऊन थकबाकी भरण्यासाठी एक आठवड्याची मुदत दिली जाणार आहे. त्या कालावधीत थकीत कर त्यांनी जमा केला नाही, त्यांच्या लक्झरी वस्तू जप्त केल्या जाणार आहेत. यापूर्वीही थकित मिळकतरधारकांच्या घरासमोर पालिकेने बॅंड वाजविण्याची मोहीम राबविली होती.

PCMC News Latest News
आदित्य ठाकरेंनी शहाजीबापूंचं वाढवलं टेन्शन ..आबांचं नावं घेत म्हणाले..

दरम्यान, मिळकतकर वसुलीसाठी कार, फ्रीज, टीव्ही जप्त करण्याचा निर्णय त्वरित मागे घेण्याची मागणी स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे यांनी पालिका आयुक्त तथा प्रशासक शेखरसिंह यांच्याकडे आज केली.

हा निर्णय अत्यंत चुकीचा असून त्यामुळे शहराची प्रतिमा मलिन होऊ शकते.तसेच थकबाकीदारांची समाजात नाचक्की करून वसुली करणे ही आपली संस्कृती नाही,असे त्यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

PCMC News Latest News
Bharat Jodo : विमान उडावे, तसे प्रकल्पही उडून गुजरातमध्ये जातायेत..

गेल्या दोन -अडीच वर्षांत कोरोनाने हजारोंच्या नोकऱ्या गेल्या. धंदे बंद पडले. अनेकांना बँकांचे हप्ते थकल्याने सर्वस्व गमवावे लागले. अनेक घरांतून कमावणारे दिवंगत झाले. हाताला काम नसल्याने समाजात प्रचंड असंतोष खदखदतो आहे. या परिस्थितीवर मात करून शहरातील उद्योग व्यवसाय चालक आता कुठे उभारी घेत आहेत. अशात मिळकत वसुलीसाठी हा निर्णय जनतेचा अपमान करणारा आहे,असे त्यांचे म्हणणे आहे.

यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो,अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.मिळकतकर वसुलीसाठी सनदशीर मार्ग अवलंबावा,असा सल्ला त्यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com