ACB Action : पिंपरीच्या नव्या सीपींचे स्वागत झाले दोन लाखांची लाच मागणाऱ्या पीएसआयच्या अटकेने

ACB Action : दोन लाखांची लाच मागितल्याबद्दल पिंपरीत पीएसआयला अटक
ACB Action
ACB Action Sarkarnama

पिंपरी : पुणे एसीबीची (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) सूत्रे हाती घेतल्यापासून एसपी अमोल तांबे यांनी मोठे मासे गळाला लावण्याच्या कारवाईचा धडाका लावला आहे. त्यात त्यांनी आज दोन लाख रुपयांची लाच मागणाऱ्या पीएसआयविरुद्ध (फौजदार तथा पोलिस उपनिरीक्षक) लाचखोरीचा गुन्हा दाखल करून त्यात त्याला अटक केली. (Pune ACB Trap)

या महिन्यात मुदतपूर्व तडकाफडकी बदली झालेले पिंपरी-चिंचवडचे (Pimpri-Chinchwad) पोलिस आयुक्त (सीपी) अंकुश शिंदे यांच्या जागी आलेले विनयकुमार चौबे यांचे स्वागत त्यांच्या एका पोलिस अधिकाऱ्याच्या लाचखोरीतील अटकेने झाले आहे. नव्या आयुक्तांनी १४ तारखेला पदभार घेतल्यानंतर पंधरवड्यातच त्यांच्या एका पीएसआयविरुद्ध एसीबीची ही कारवाई झाली आहे.

ACB Action
CM : मुख्यमंत्र्यांचे भाषण म्हणजे शिळ्या कढीला उत, अजित पवारांचा खोचक टोला..

रोहित गणेश डोळस (वय ४१) असे त्याचे नाव आहे. तो पिंपरी पोलिस ठाण्यात नेमणुकीस आहे. तेथेच त्याच्याविरुद्ध लाचखोरीचा हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्याने लाच मागितल्याच्या तक्रारीची २ डिसेंबरलाच एसीबीने पडताळणी केली होती. मात्र, त्यानंतर त्यांचा ट्रॅप यशस्वी झाला नाही. म्हणजे सुगावा लागला की काय डोळस याने लाचेसाठी तगादा लावला नाही..म्हणून महिनाभर वाट पाहून आज (ता.३०) एसीबीने त्याच्याविरुद्ध लाच मागितल्याबद्दल गुन्हा दाखल केला.

ACB Action
Uday Samant : सामंतांची डिग्री खरी की खोटी; वाद सुरूच...पण ज्ञानेश्वर विद्यापीठ तर देशातील स्किल युनिव्हर्सिटीचा पाया

त्यांच्याकडील तक्रारदाराच्या भावाविरुद्ध पिंपरी पोलिस ठाण्यात एक तक्रार अर्ज आला होता. त्यात भावाला आरोपी न करण्यासाठी तसेच दिवाणी बाब म्हणून हे प्रकरण बंद करण्याकरिता डोळसने दोन लाख रुपये या तक्रारदाराकडे लाच मागितली होती. एसीबी पुणे रेंजचे एसपी तांबे, अॅडिशनल एसपी सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आल्याचे या युनिटचे डीवायएसपी (प्रशासन) श्रीहरी पाटील यांनी सांगितले. एसीबीचे पीआय भारत साळूंखे पुढील तपास करीत आहेत. (Crime News)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com