Pooja Khedkar : 'पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी माझा अपमान केला'; पूजा खेडकरांचं थेट सरकारला पत्र

Khedkar Letter to Maharashtra Govt : पुण्यातून वाशिमला बदली झाल्यानंतर खेडकरांनी राज्याच्या अतिरिक्त सचिव नितीन गद्रे यांना पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी जिल्हाधिकारी दिवसेंवर आरोप केलेले आहेत.
Pooja Khedkar
Pooja KhedkarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : वादग्रस्त ठरलेल्या माजी आएएस अधिकारी पूजा खेडकरने सरकारला लिहिलेल्या पत्रात पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिणार्थी म्हणून कामास सुरूवात केल्याचा पहिल्या दिवसापासून दिवसे यांनी माझा अपमान केला आहे, असे खेडकर यांनी म्हटले आहे. याबाबत खेडकरांनी राज्याचे अतिरिक्त सचिव यांना पत्र लिहून आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रशिक्षण काळात अवास्तव मागण्या केल्याने पूजा खेडकर Pooja Khedkar वादाच्या भोवऱ्यात सापडल्या. त्यानंतर त्यांनी सादर केलेल्या अपंगाच्या सर्टिफिकेटची चौकशी झाली. खडेकरांनी नावात बदल करून यूपीएससीचे अनेक अटेम्ट दिल्याचेही स्पष्ट झाले. त्यानंतर यूपीएससीने त्यांची आयएएस म्हणून झालेली निवडच रद्द केलेली आहे.

दरम्यान, पुण्यातून वाशिमला बदली झाल्यानंतर खेडकरांनी राज्याच्या अतिरिक्त सचिव नितीन गद्रे यांना पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी जिल्हाधिकारी दिवसेंवर काही आरोप केलेले आहेत.

खेडकरांनी आपल्या पत्रात, दिवसे यांनी सरकारला पाठवलेल्या अहवालाचा संदर्भ दिला. त्यानंतर माध्यमांतील झालेल्या चर्चांनी अनेक अडचणींना सामोरे जावे लागल्याचेही नमूद केले आहे. जनमाणसांत माझी प्रतिमा गर्विष्ठ अधिकाऱ्यासारखी बनली गेली आहे. यामुळे मला मानसिक त्रास झाला असून मी अत्यंत अस्वस्थ असल्याचेही स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या अँटी-चेंबरवर कब्जा केल्याच्या आरोप खेडकरांवर होता. त्यावर, अतिरिक्त जिल्हाधिकारी अजय मोरे यांनी स्वेच्छेने मला त्यांचा अँटी-चेंबर दिला होता. त्यांनी तो चेंबर मला देण्यासाठी त्यांच्या सांगितले होते. त्यानुसार कर्मचाऱ्यांनी माझ्या गरजा जाणून घेत सर्व व्यवस्था केली होती.

त्यानंतर जिल्हाधिकारी दिवसे Suhas Diwase सरांना कोणीतरी माझ्या या चेंबरबाबत माहिती दिली. त्यामुळे ते कदाचित संतापले असतील. त्यातून त्यांनी संबंधित तहसीलदारांना बोलावून माझे फर्निचर अँटी चेंबरमधून काढण्याचे आदेश दिले. त्याबाबत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांनी माझ्यावर अँटी-चेंबरमध्ये अतिक्रमण केल्याचा आरोप केला, असेही खेडकरांनी पत्रात म्हटले आहे.

Pooja Khedkar
Akole Politcs : नगरच्या अकोल्यात तिरंगी लढत होणार? असं आहे राजकीय गणित...

बसण्याच्या जागेवर प्रकरण वाढले होते. त्यावर दुसऱ्याच दिवशी मी जिल्हाधिकारी दिवसे यांना भेटण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मात्र ते व्यस्त असल्याचे सांगून भेट दिली नाही. झालेल्या प्रकाराबाबत जिल्हाधिकारी दिवसेंची माफी मागितली होती. तसेच माझ्या बसण्याच्या व्यवस्थेबाबत ते जो काही निर्णय घेतील, तो मान्य असल्याचेही त्यांना कळवले होते, असेही खेडकरांनी पत्रात स्पष्ट केले आहे.

दरम्यान, पूजा खेडकरांचे वडील दिलीप खेडकरांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांवर दबाव आणल्याचाही आरोप झाला आहे. त्यातून त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. याबाबत खेडकरांनी म्हटले, की वडील, दिलीप खेडकर हे माझा जेवणाचा डबा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. मात्र त्यांच्यावर दबावाचा आरोप करण्यात आला.

Pooja Khedkar
Video Pune News : ...अन् पुणेकर थेट शिंदे गटाच्या आमदाराला भिडला, व्हिडिओ व्हायरल

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com