Video Pune News : ...अन् पुणेकर थेट शिंदे गटाच्या आमदाराला भिडला, व्हिडिओ व्हायरल

Pune News MLA Kishor Darades Driver Video Viral : रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने सायरन वाजवत गाडी चालवल्याबद्दल या पुणेकरांने आमदाराच्या ड्रायव्हरला जाब विचारला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Pune News MLA Kishor Darade
Pune News MLA Kishor DaradeSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 11 August : पुणेरी पाट्या असो वा एखाद्याने चूक केली तर त्याला जाब विचारण्याची पुणेकरांची पद्धत अनोखी आणि खास असते. त्यामुळेच 'पुणे तिथे काय उणे' असं म्हटलं जातं. सध्या असाच एका पुणेकर थेट आमदाराला भिडला आहे.

रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने सायरन वाजवत गाडी चालवल्याबद्दल या पुणेकरांने आमदाराच्या ड्रायव्हरला जाब विचारला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार किशोर दराडे (MLA Kishor Darade) हे पुण्यातील बाजीराव रोडने जात असताना. त्यांचा ड्रायव्हर सायरन वाजवत गाडी चालवत होता.

यावेळी एका सुज्ञ पुणेकरांने (Pune) त्या ड्रायव्हरला गाडीचा सायरन का वाजत आहे? असा प्रश्न विचारला. यावेळी ड्रायव्हरच्या शेजारी खुद्द नाशिक शिक्षक मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार किशोर दराडे बसले होते. तरीही या पुणेकराने ड्रायव्हरला गाडीची काच खाली घ्यायला लावत सीट बेल्ट का लावला नाही? असा प्रश्न विचारला.

Pune News MLA Kishor Darade
Ambadas Danve : महाराष्ट्रातून उद्योग पळवले जात होते, तेव्हा शेणमार करणारे कुठे होते ?

पोलिस (Police) आणि आमदारांना पाहून देखील या पुणेकराने ड्रायव्हरला बोल सुनावल्याचं पाहून खुद्द आमदारसाहेब थक्क झाले. शिवाय तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने 'आम्ही जनता आम्ही तुम्हाला निवडून देतो, तेव्हा ते आमदार आहेत. पोलिसांकडे पाहू नको,' असं म्हणत या पुणेकरांनी आमदार दराडेंच्या ड्रायव्हरला दम भरल्याचंही व्हिडिओत दिसत आहे.

Pune News MLA Kishor Darade
Maharashtra Politics: महायुतीत खलबतं; मंत्रिपदाची आस लावून बसलेल्या नेत्यांची महामंडाळावर वर्णी ?

आमदार दराडे हा सर्व प्रकार पहात होते. शेवटी जाताना पुणेकरांने संताप व्यक्त शिवी देऊन तेथून काढता पाय घेतला. मात्र, या सर्व प्रकारानंतर पुन्हा एकदा पुण्यातील प्रंचड वाहतूक कोंडीमध्ये असे सायरन वाजवणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी समोर येऊ लागली आहे. तसंच गरजेशिवाय सायरनचा वापर करु नये अशीही नागरिकांची मागणी आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com