Pune Porsche Accident : 'कार'नामा करणाऱ्या बाळाच्या आई - वडिलांना बुधवारपर्यत पोलिस कोठडी

Pune Porsche hit ad run case Porsche Accident Update Minor's father, grandfather in custody : कल्याणीनगर अपघात प्रकरणात विशेष कोर्टाने आई वडिलांना 5 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे
Pune Porsche Accident Shivani Agarwal
Pune Porsche Accident Shivani AgarwalSarkarnama

Pune News : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी रक्ताचे सॅम्पल बदलून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणात  कारनामा करणाऱ्या बाळाच्या आई - वडिलांना विशेष कोर्टाने  5 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पॊलिसांनी अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अगरवाल आणि आई शिवानी अगरवाल यांना रविवारी दुपारी सुटीच्या न्यायालयात हजर केले  होते. अल्पवयीन आरोपीच्या आई ने मुलाच्या ऐवजी स्वतःचे रक्त तपासणीसाठी दिल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. तर अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल आगरवाल यांनी या प्रकरणात मदत केल्याचे समोर आले आहे. त्यानुसार विशाल आगरवाल यांना शनिवारी संध्याकाळी ससूनमधील डॉक्टरांवर दाखल असलेल्या गुन्हात हि अटक करण्यात आली आहे. डॉक्टरांवर दाखल असलेल्या गुन्ह्यात विशाल अगरवाल यांना अटक करण्याची परवानगी मिळण्यासाठी पोलिसांनी अर्ज दाखल केला होता. या प्रकरणात विशाल अगरवालवर दाखल झालेला हा तिसरा गुन्हा आहे.


तावरे सह इतरांच्या कोठडीत पाच जूनपर्यंत वाढ :


अल्पवयीन आरोपीला वाचविण्यासाठी त्याच्या रक्ताचा नमुना बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी ससून मधील डॉ. अजय तावरे आणि आपत्कालीन विभागाचे अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर यांच्यासह शिपाई अतुल घटकांबळे यांच्या पोलिस कोठडीत विशेष न्यायालयाने पाच जूनपर्यंत वाढ केली आहे. तसेच या गुन्ह्यात कलमवाढ देखील वाढवण्यात आली आहे.

विशाल अगरवाल, पब मालकाच्या जामिनावर बुधवारी सुनावणी :


कल्याणी नगर अपघात प्रकरणातील न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींच्या जामीना बाबत पोलिसांनी त्यांचे म्हणणे शनिवारी सादर केले आहे. त्यानुसार आता आरोपींच्या अर्जावर आता बुधवारी सुनावणी होणार असून त्यांना जमीन मिळण्याची दाट शक्यता आहे. 

अल्पवयीन आरोपीला मोटार चालविण्यास देण्याबरोबरच  त्याला मद्य पुरविल्याप्रकरणी अटकेत असलेले बांधकाम व्यावसायिक, कोझी व ब्लॅक पबच्या मालकांसह कर्मचाऱ्यांनी जामिनासाठी कोर्टात अर्ज केला आहे. त्या अर्जावर म्हणणे मांडण्यासाठी पोलिसांनी  १५ दिवसांची मुदत मागितली होती. मात्र  त्याला बचाव पक्षाने विरोध केला होता.  आता न्यायालयाने पोलिसांना शनिवारी आपले म्हणणे मांडण्याची सूचना केली आहे. त्यानुसार पोलिसांनी आपले म्हणणे लेखी स्वरूपात मांडणार आहेत .

Pune Porsche Accident Shivani Agarwal
Sudhir Mungantiwar : ‘यह कहाॅं आ गया मैं...’ ; एक्झिट पोलनंतर सुधीर मुनगंटीवारांचा डोक्याला हात!

आतापर्यंत कोणा कोणाला झाली अटक 


- अल्पवयीन मुलाचे वडील व बांधकाम
व्यावसायिक असलेले विशाल सुरेंद्रकुमार अग्रवाल
- मुलाची आई शिवानी विशाल अग्रवाल
- मुलाचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल
- कोझी पबचे मालक नमन प्रल्हाद भुतडा
- कोझी पबचे व्यवस्थापक सचिन अशोक काटकर
- ब्लॅक पबचे व्यवस्थापक संदीप रमेश सांगळे
- कर्मचारी नीतेश धनेश शेवानी
- ब्लॅकच्या बार काउंटरच व्यवस्थापक जयेश सतीश गावकर
- ससूनच्या न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे
- आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर
- शिपाई अतुल घटकांबळे

Pune Porsche Accident Shivani Agarwal
Nashik Congress politics: काँग्रेसने महापालिकेला ठणकावले, कारवाई करा अन्यथा....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com