Pune ACB News: एसीबीचा दणका; वीस हजारांची लाच मागणाऱ्या वकिलाविरुद्ध गुन्हा दाखल

Pune Crime News: उत्तर पुणे जिल्ह्यात पाच दिवसांत लाचखोरीची दुसरी घटना; वीस हजारांची लाच मागितल्याबद्दल वकिलाविरुद्ध गुन्हा दाखल
Pune ACB News
Pune ACB NewsSarkarnama
Published on
Updated on

Pimpri News: जप्त केलेली अपघातातील बाईक परत देण्यासाठी एका तरुणाकडून आठ हजार रुपयांची लाच घेताना उत्तर पुणे जिल्ह्याच्या मंचर पोलिस ठाण्यातील एपीआय संतोष साळुंखे आणि पोलिस कॉन्स्टेबल संदीप रावतेला 24 डिसेंबरला पकडण्यात आले होते.

तर, शुक्रवारी (ता.29) पुणे ग्रामीणमधीलच जुन्नर पोलिस ठाण्यावरील पीएसआय परवतेंच्य़ा नावे एका सत्तर वर्षीय ज्येष्ठाकडून वीस हजार रुपयांची लाच मागितल्याबद्दल शिवम गजानन नायकोडी (वय 30) या वकिलाविरुद्ध पुणे एसीबीने गुन्हा दाखल केला.

नमूद करण्याजोगी बाब म्हणजे नायकोडी हा एसीबीच्या तक्रारदाराचाच वकील आहे. त्यांनी 9 तारखेला जुन्नर पोलिस ठाण्यातील पीएसआय परवते यांनी 25 हजार रुपयांची लाच मागितल्याबद्दल एसीबीकडे तक्रार दिली होती. त्यानंतर 17 तारखेला त्यांचे आकस्मिक निधन झाले.

त्यामुळे या प्रकरणात पुणे एसीबीतील पीआय रुपेश जाधव यांना आता फिर्यादी व्हावे लागले. या ज्य़ेष्ठांच्या मुलाला जुन्नर पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात अटक केली होती. त्याचे तपासाधिकारी परवते यांना सांगून त्याला लवकर जामीन मिळवून देतो, असे नायकोडीने या ज्येष्ठाला सांगत त्यांच्याकडे ही लाच मागितली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, लाचखोरीच्या दुसऱ्या घटनेत 75 वर्षाच्या दुसऱ्या ज्येष्ठ व्यक्तीकडून तीन हजार रुपयांची लाच घेताना ससून रुग्णालयातील लिफ्टमन जालिंदर चंद्रकांत कुंभार (वय 55)याला परवा (ता.27) पुणे एसीबीने पकडले.

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ड्रग्ज तस्कर ललित पाटीलचे दोन कोटी रुपयांचे एमडी हे ड्रग यावर्षी 1 ऑक्टोबरला जिथे पकडले. त्या ससूनच्या मुख्य प्रवेशव्दाराजवळच पुणे रेंज एसीबीने लाच घेताना कुंभारला पकडले. त्याने तक्रारदार ज्येष्ठाचे एक लाख 43 हजाराचे वैद्यकीय बिल मंजूर करण्यासाठी ही दोन टक्के लाच घेतली.

(Edited by- Ganesh Thombare)

Pune ACB News
Amol Kolhe: 'आपल्यालाच का टार्गेट केलं जातंय ?' कोल्हेंचा सवाल; मोदी, अजित पवार गटावरही केले गंभीर आरोप

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com