पुणे : पुणे (Pune) आणि पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) सकाळपासूनच पडणाऱ्या पावसाने यंदाच्या मोसमातील विक्रम प्रस्थापित केले आहेत. प्रथमच सलग सहा तासांमध्ये जवळपास ४५ मिलिमीटर पावसाने (Rain) हजेरी लावली. सकाळी साडेआठ ते दुपारी अडीच यावेळेत शहर व परिसरात सरासरी ४५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा (Torrential rain) अंदाज हवानाम विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे शहरातील शाळांना गुरुवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. (Pune rain Latest Updates)
मागील दहा दिवसांपासून शहरात मॉन्सून मोठ्या प्रमाणात सक्रिय झाला आहे. मंगळवार (ता. १२) पासून परिसरात संततधार कोसळत आहे. बुधवारी पहाटेपासूनच पावसाने धुवाधार बॅटींगला सुरवात केली. चिंचवड परिसरात तुलनेने जास्त जोरदार पाऊस कोसळत आहे. या सहा तासांमध्ये चिंचवड येथे ५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
संततधार पावसामुळे शहरातील बहुतेक रस्त्यांना ओढ्या नाल्यांचे स्वरूप प्राप्त झाले असून, मुळा-मुठा आणि पवना नदी दुथडी भरून वाहत आहे. पुढील आठवडाभर तरी आकाश सामान्यतः ढगाळ आणि बहुतेक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. विशेष करून गुरुवारी (ता.१४) शहर व परिसरात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमिवर पुणे परिसरातील शाळांना गुरुवारी सुट्टी जाहीर केली आहे. तर पिंपरी-चिंचवडमध्ये गुरुवार शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
मावळ परिसरात जोरदार पाऊस होत असल्यामुळे पवना नदी दुथडी भरुन वाहत आहे. बुधवारी दुपारनंतर आणि रात्री पावसाचा जोर कायम राहिल्यास नद्यांना मोठ्या प्रमाणात पुर येण्याची शक्यात आहे. त्यामुळे शहरातील अनेक पुल पाण्याखाली जाऊ शकतात. याची खबरदारी घेऊन प्रशासनाने शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. दरम्यान, बुधवारीही शाळांना सुट्टी असल्याचे प्रशासनाने जाहीर केले. मात्र, हा आदेश शाळा भरल्यानंतर काढण्यात आला.
तसेच नवी मुंबई कार्यक्षेत्रातील शाळांनाही उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जरी केला असून उद्या अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. अतिवृष्टी यापुढे अशीच राहिल्यास शाळा व्यवस्थापनाला सुट्टी संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार असल्याचे पत्रक मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी काढले आहे.
सकाळी साडेआठ ते दुपारी अडीच पर्यंतचे पर्जन्यमान
शिवाजीनगर : ४४.८
लोहगाव : ४१.६
चिंचवड : ४९.५
लवळे : ४५
मगरपट्टा : ३६
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.