मुंबई : शिवसेना (ShivSena) नेत्या दिपाली सय्यद (Deepali Syed) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली आहे. शिंदे यांना मराठा समाजाचे नेतृत्व म्हणून ओळख मिळावी, त्यासाठी त्यांनी 'मातोश्री'वर येऊन चर्चा सुरू करावी, याकरिता भेट घेतल्याचे दिपाली सय्यद यांनी सांगितले.
या संदर्भात दिपाली सय्यद यांनी ट्वीट केले आहे. आपल्या ट्वीटमध्ये त्या म्हणाल्या ''द्रोपती मुर्मू एक आदिवासी समाजाचे नेतृत्व म्हणुन उद्धव साहेबांनी (Uddhav Thackeray) त्यांना पाठिंबा दिला आहे. तश्याच प्रकारचा पाठिंबा शिंदेसाहेबांना एक मराठा समाजाचे नेतृत्व म्हणुन मिळावा या करीता शिंदेसाहेबांनी 'मातेश्री'वर येऊन चर्चा सुरू करावी याकरीता आज भेट होईल, असे त्यांनी शिंदे यांची भेट घेण्याआधी म्हटले होते.
भेटीसाठी निघताना दिपाली सय्यद यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्या म्हणाल्या की, शिवसेनेचे दोन गट एकत्र करण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यासाठी मी शिंदेंना भेटायला चालले आहे. आज गुरुपौर्णिमा आहे, शिंदेही बाळासाहेबांना अभिवादन करायला जाणार आहे आणि ठाकरेही. दोघांचेही गुरू एकच आहेत. मग या चांगल्या दिवशी काहीतरी चांगली सुरूवात व्हायला हवी, अशी माझी इच्छा आहे.
बाळासाहेबांना गुरुदक्षिणा म्हणून शिंदे आणि ठाकरेंनी एकत्र यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली होती. माझ्यासोबतच सर्व शिवसैनिकांचीही हीच अपेक्षा आहे, असेही दीपाली सय्यद म्हणाल्या होत्या.
दरम्यान, शिंदेच्या बंडानंतर शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देत बंडखोर आमदारांवर टीका केली होती. शिवसेनेच्या आमदारांनो तुम्ही काय मेलेल्या आईचे दुध पिऊन सत्तेत गेलात का असा रोखठोक सवाल त्यांनी केला होता. उद्धव साहेबांविरोधात चिरीट तोम्मया बोलणार आणि तुम्ही ऐकून घेणार हिच का शिवसेना तुमच्या रक्तात भिनली आहे? अशी टीका दिपाली सय्यद यांनी केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.