Supriya Sule VIDEO : मोदींच्या सभेला महिला गेल्या तरी आम्ही चोरून फोटो काढणार नाही!

PM Narendra Modi Rally in Pune Assembly Election : महायुतीच्या प्रचार सभेदरम्यान भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी लाडकी बहीण योजनेबाबत केलेले विधान सध्या चर्चेत आहे.  
Supriya Sule, Narendra Modi
Supriya Sule, Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Pune News : लाडकी बहीण योजनेचे पैसे घेऊन ज्या महिला काँग्रेसच्या सभेला जात आहेत, त्यांचे फोटो काढा, या भाजप खासदार धनंजय महाडिकांच्या विधानावर विरोधकांनी हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या विधानाचा आधार घेत भाजपावर निशाणा साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यामध्ये उद्या जाहीर सभा होणार आहे. याबाबत विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, अतिथी देवो भव. प्रत्येक येणाऱ्या पाहुण्याचं आम्ही स्वागत करणारच आहोत. कुठली ही महिला कोणत्याही सभेला गेली तरी तिचा मानसन्मान करू. आम्ही धमकी देणार नाही आणि आम्ही कोणत्याही महिलेचे चोरून फोटो काढत नाही, असा टोला सुप्रिया सुळेंनी भाजपला लगावला.

Supriya Sule, Narendra Modi
Sanjay Raut : व्यापारी नेहमी खोटं बोलतो, सावरकरांना भारतरत्न का देत नाही? शहांनी ठाकरेंना ललकारलं, राऊतांनी सगळंच काढलं

महायुतीचा वचननामा महाविकास आघाडीने कॉपी केला असल्याची टीका महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आली. याला उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, सध्या महायुतीच्या नेत्यांकडे महाविकास आघाडी बाबत बोलण्यासाठी काहीच राहिलेले नाही. कारण मागील निवडणुकांमध्ये ते भ्रष्टाचारासारखे विषय घ्यायचे. मात्र यावेळेस ते स्वतःच भ्रष्टाचारात अडकले असल्याने भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांना आमच्या विरोधात बोलण्यासारखं काहीच राहिलेलं नाही.

देशातील सर्वात मोठी कर्जमाफी ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने दिली आहे. तसेच शेतीमालाला हमीभाव देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळातच मिळाला आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. लाल रंगाच्या संविधानावरून देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. ते अर्बन नक्षलवादाचे प्रतीक असल्याचे देखील त्यांनी म्हटले होते.

Supriya Sule, Narendra Modi
Devendra Fadnavis : 'ते डोनाल्ड ट्रम्पला सुद्धा राष्ट्राध्यक्षपद सोडायला सांगतील'; फडणवीसांचा ठाकरेंना टोला

फडणवीसांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, दुर्दैव आहे. शाहू, फुले आंबेडकराचा अपमान करणे, संविधानाचा अपमान करणे, महिलांचा अपमान करणे, सातत्याने चुकीचा इतिहास सांगण्याचं पाप भाजप करत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com