Mumbai News, 11 Nov : भाजपचे वरिष्ठ नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी काल मुंबईत येऊन उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींना स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल दोन चांगले शब्द बालायला सांगावं, असं आव्हान त्यांनी दिलं होतं.
अमित शहांच्या याच वक्तव्याचा शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी समाचार घेतला आहे. बाळासाहेब ठाकरेंवर इतकं प्रेम होतं तर आपण त्यांची शिवसेना गैरमार्गाने फोडली नसती. अमित शहांचं बोलणं काय मनावर काय घेता? बाळासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्रात यांचा पक्ष एक इंच पुढे सरकू शकू शकत नाही.
त्याच बाळासाहेबांची शिवसेना (Shivsena) आपण फोडली, माणसं विकतं घेतली त्याला तुम्ही प्रेम समजता का? असा सवाल राऊतांनी केला. तर तुमच्यापेक्षा काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक अधिक चांगले आहेत. त्यांना बाळासाहेब ठाकरेंबद्दल प्रेम आहे. ते तुमच्यासारखे ढोंगी प्रेम करत नाहीत. त्यांचं प्रेम पाठीत खंजीर खुपसणारं नाही, असंही राऊत म्हणाले.
दरम्यान, यावेळी त्यांनी वीर सावरकरांना भारतरत्न देण्याचा अधिकार अमित शहांना (Amit Shah) असताना ते त्यांचा सन्मान का करत नाहीत असा पलटवार केला. राऊत म्हणाले, "वीर सावरकरांच्या विषयी नसती उठाठेव करू नका. तुम्ही भारतरत्न का देत नाही ते सांगा. आम्ही दहा वर्षापासून सांगतोय सावरकरांना भारतरत्न द्या आणि त्यांचा सन्मान करा. तो त्यांना भारतरत्न देणं अमित शहांच्या हातात आहे. 370 कलम हटवल्यानंतर पाठ थोपटून घेऊ शकतात, तर द्यांना सावरकरांना भारतरत्न."
तर ठाकरेंबाबात शहांकडून सर्टीफीकेट घ्यायची गरज नाही. तुमच्या बॅनवरचा बाळासाहेबांचा फोटो काढा लोकं तुम्हाला राज्यात उभं करणार नाहीत. 370 ला शिवसेनेने विरोध केला हे शाह खोटं बोलत आहेत. शिवसेनेने विरोध नाही तर पाठिंबा दिला होता. मात्र, व्यापारी नेहमी खोटं बोलतो.
दुकानदार आपल्या फायद्यासाठी एकतर भेसळ करतो किंवा ग्राहकाला फसवतो, अशी टीका त्यांनी यावेळी शहांवर केली. तसंच राज्यात यंदा महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) 160 ते 165 मिळतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राज्यात आता जे सरकार आहे ते चंद्रचूड कृपेने किंवा मोदी-शहांच्या कृपेने पुन्हा येणार नाही असा दावा राऊत यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.