Nasrapur girl case : 'महिलांसाठी हा काळ काळरात्र'; पुण्यातील नसरापूर इथल्या घटनेवरून विजय वडेट्टीवारांचा संताप

Congress leader Vijay Wadettiwar strongly criticizes CM Devendra Fadnavis over the minor assault case in Nasrapur village of Pune Bhor taluka : काँग्रेस विजय वडेट्टीवार यांनी पुण्यातील नसरापूर इथल्या चिमुरडीच्या अत्याचाराच्या घटनेवरून, राज्यातील गुन्हेगारीवरून संताप व्यक्त केला आहे.
Nasrapur girl case
Nasrapur girl caseSarkarnama
Published on
Updated on

Pune minor assault case : पुण्यातील नसरापूर (ता. भोर) गावातील चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करत, तिची निर्दयी हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेचे संतापजनक पडसाद उमटत आहे.

या गुन्ह्यातील 65 वर्षीय विकृत व्यक्तीवर कठोरातील कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी, या घटनेवरून राज्यातील महिलांसाठी हा काळ काळरात्र ठरत आहे, असा घणाघात केला आहे.

भोर तालुक्यातील नसरापूर गावातील चार वर्षांच्या चिमुरडीवर 65 वर्षीय विकृत व्यक्तीने अत्याचार करून तिची निर्दयी हत्येच्या प्रकारानं खळबळ उडाली आहे. या अमानुष घटनेमुळे गावासह राज्यात संतापाची लाट उसळली आहे. पुरोगामी महाराष्ट्रात (Maharashtra) नेमकं काय चाललं आहे, असा प्रश्न करत आहे.

काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी, यावर 'एक्स'वर पोस्ट करत आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली. 'नसरापूरची घटना म्हणजे माणुसकीचा पराभव आहे! असे म्हणत, राज्यात चार वर्षांची चिमुरडीही सुरक्षित नसेल, तर तुमच्या उत्कृष्ट कायदा-सुव्यवस्थेच्या गप्पा कशासाठी? गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरलेला नाही हेच सत्य आहे,' असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

Nasrapur girl case
Indurikar Maharaj daughter wedding : “काय बोंबलायचं ते बोंबला!” टीकांना झुगारत इंदुरीकर महाराजांच्या कन्येचा शाही विवाह चर्चेचा केंद्रबिंदू

माता-भगिनी, लेकी बाळींसाठी प्रत्येक जागा असुरक्षित आणि प्रत्येक क्षण दहशतीचा झाला. नसरापूरमधील त्या चिमुकलीचा आक्रोश गृहमंत्रालयापर्यंत पोहोचतोय का? तुमची यंत्रणा फक्त कागदावर भक्कम आहे का? राज्यातील महिलांसाठी हा काळ काळरात्र ठरत आहे, असा गंभीर सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला.

Nasrapur girl case
Muslim wedding card : लग्नपत्रिकेत ‘दोन प्रेरणास्थानं’; शिवाजी महाराजांसोबत टिपू सुलतान, मंत्री राणेंची कडवी भूमिका

कोणतीही घटना झाली की, गृहमंत्री एकतर क्लिनचीट देतात, नाही तर कठोर कारवाई करू, अशा बाता मारतात! कठोर कारवाई केली असती, तर आज या चिमुकलीचा बळीच गेला नसता! महाविकास आघाडीने यासाठीच शक्ती कायदा आणला होता. पण या सरकारला तेही बघवत नाही. शक्ती कायदा आता तरी आणा, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

गृहमंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारावी या प्रकरणाची, हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवावे आणि आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे! या दुर्दैवी घटनेबाबत स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत असलेला संताप अत्यंत रास्त आहे, असेही विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

सरकारने नागरिकांच्या संयमाचा अंत पाहू नये, न्यायासाठी आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करू नये. या दुर्दैवी घटनेतील नराधमाला कडक शासन करावे व राज्यातील महिलांना अशा नराधमांपासून अभय द्यावे. अन्यथा जनतेचा हा उद्रेक आपली खुर्ची उलथवून टाकल्याशिवाय थांबणार नाही! असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com