Trupti Desai : धनंजय मुंडे यांचा पापाचा घडा भरत आला, आता मुख्यमंत्री राजीनामा घेणार?

Pune Bhumata Brigade Tripti Desai Bandra Court Karuna Munde Beed Minister Dhananjay Munde : वांद्रे कौंटुबिक न्यायालयाच्या निर्वाळ्यानंतर करुणा मुंडे यांच्या न्यायालयीन लढाईवर पुण्याच्या तृप्ती देसाई यांची प्रतिक्रिया.
Trupti Desai
Trupti DesaiSarkarnama
Published on
Updated on

Pune News : करुणा मुंडे-शर्मा यांनी वांद्रे कौटुंबिक कोर्टामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचाराची केस दाखल केली होती.

या कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्या बाबत केलेले आरोप कोर्टाने मान्य केले आहेत. तसेच करुणा शर्मा यांना प्रतिमहा दोन लाख रुपये पोरगी देण्याचे आदेश देखील दिले आहेत.

तृप्ती देसाई म्हणाल्या,"करुणा शर्मा या धनंजय मुंडे यांच्या विरोधात न्याय मागण्यासाठी अनेक नेत्यांकडे गेल्या. अनेक ठिकाणी त्यांनी अर्ज केले. मात्र त्यांना कोणीच मदत केली नाही. त्यानंतर त्यांनी तीन वर्ष न्यायालयीन (Court) लढा दिला आणि ही लढाई आता त्या जिंकल्या आहेत".

Trupti Desai
Karuna Munde : करुणा मुंडे ढसाढसा रडल्या, सर्व सांगितलं; जेलमधील दिवस ते धनंजय मुंडेंसमोर वाल्मिक कराडने केलेल्या मारहाणीपर्यंत...

करुणा शर्मा या सातत्याने मी करुणा शर्मा नसून मी करुणा धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आहे आणि धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी आहे, असं सांगत होत्या. आज कोर्टाने त्यावर शिक्कामोर्तब केला आहे. त्यांना पोटगी देण्याचे देखील आदेश दिला असून धनंजय मुंडे यांना कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी दोषी ठरविण्यात आला आहे.

धनंजय मुंडे यांच्या पापाचा घडा आता भरत आला असून त्यांच्या विरोधातील पहिली कोर्टाची ऑर्डर आहे, जी सकारात्मक आहे. वाल्मिक कराड आणि त्यांची टोळी धनंजय मुंडे यांच्या आशीर्वादाने काम करत होती, ती टोळी आता जेलमध्ये आहे. या प्रकरणांमध्ये मुंडे यांच्यावर विविध आरोप झाले. मात्र त्यांनी नैतिकता दाखवत राजीनामा दिला नाही.

Trupti Desai
TOP 10 News : अजितदादांचे निकटवर्तीय इनकम टॅक्सच्या रडारवर ; तृणमूलच्या खासदाराचे UCC बद्दल मोठं वक्तव्य - वाचा टॉप हेडलाईन्स

मला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारायच आहे. धनंजय मुंडे यांना घरगुती हिंसाचार प्रकरणात दोषी ठरवलं आहे. पत्नीचा छळ करणारा पती तुमच्या मंत्रिमंडळात आहे. त्याला तुम्ही मंत्रिमंडळात ठेवणार आहात का? देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांचा तातडीने राजीनामा घेणे गरजेचे आहे, असं तृप्ती देसाई म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com