Narendra Modi Temple : काय सांगता..? PM मोदींचं मंदिर बांधणाऱ्यानेच भाजपची साथ सोडली; 'हे' धक्कादायक कारण आलं समोर

Pune BJP Activist Mayur Munde Resign : पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयीचं प्रेम,आदराच्या भावनेतून भाजप कार्यकर्ते मयूर मुंढे यांनी 2021 मध्ये पुण्यातील औंध येथे मोदींचं मंदिर बांधलं होतं.पण मोदींच्या मंदिराची बातमी भाजप नेतृत्त्वापर्यंत गेल्या.त्यांनी बोलवून मुंढेंचे कान टोचत हे मंदिर हटवण्यास सांगितलं.
Mayur Mundhe .jpg
Mayur Mundhe .jpgSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपचा सत्तेचा वनवास संपवत 2014 ला बहुमताने देशात परिवर्तन घडवून आणलं. तर मोदींच्या नेतृत्वात लढलेल्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं 'न भूतो भविष्यती' असं यश मिळवलं. या दोन्ही निवडणुकीत भाजपनं मिळवलेल्या यशात मोदींचा वाटा सिंहाचा होता.

आता मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. त्यांच्या करिष्म्यामुळे मोदींचे फक्त भारतातच नव्हे तर जगभरात चाहते पाहायला मिळतात. याचदरम्यान,पुण्यातील एका भाजप कार्यकर्त्यानं थेट मोदींचं मंदिर बांधलं होतं. त्याची प्रचंड चर्चा झाली होती. पण आता कार्यकर्ते मयूर मुंढे यांनी भाजप (BJP) पक्षाला रामराम ठोकला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयीचं (Narendra Modi) प्रेम,आदराच्या भावनेतून भाजप कार्यकर्ते मयूर मुंढे यांनी 2021 मध्ये पुण्यातील औंध येथे मोदींचं मंदिर बांधलं होतं.पण मोदींच्या मंदिराची बातमी भाजप नेतृत्त्वापर्यंत गेल्या. त्यांनी बोलवून मुंढेंचे कान टोचत हे मंदिर हटवण्यास सांगितलं. आणि अवघ्या काही दिवसांतच हे मंदिर हटवण्यात आलं होतं.पण आता याच मयूर मुंढेंनी भाजपची साथ सोडली आहे.

भाजपचे कार्यकर्ते आणि श्री नमो फाउंडेशनचे मयूर मुंढे यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा देत असल्याचं म्हटलं आहे.या राजीनाम्याची प्रत त्यांनी पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसह राज्य आणि शहर भाजप प्रमुखांना पाठवली आहे.

Mayur Mundhe .jpg
Ahmednagar Politics : कट्टर शिवसैनिक संधीच्या शोधात; 'वस्तादा'ची घेतली भेट, पुढं काय होणार...

भाजपच्या मयूर मुंढेंनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी,गृहमंत्री अमित शाह,पक्षाध्यक्ष जे.पी.नड्डा यांनाच पत्रं लिहिलं आहे. त्यांनी या पत्रात आपलं पक्ष सोडण्या मागची भूमिका स्पष्ट केली आहे. मुंढे पत्रात म्हणतात,भाजपचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून मी काम केलं.औंधचा वॉर्ड अध्यक्ष ते शिवाजीनगर युवा मोर्चाचा उपाध्यक्ष या प्रवासात मी पक्षासाठी राबलो.पण आता पक्षात प्रामाणिक कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होत आहे.बाहेरुन आलेल्यांना पक्षात अधिक महत्त्व दिलं जात आहे, अशी उघड उघड नाराजीही भाजपच्या मुंढेंनी पत्रात व्यक्त केली आहे.

विशेष म्हणजे मयूर मुंढेंनी पंतप्रधान मोदींच्या मंदिरासाठी चक्क जयपूरमधून लाल दगड मागवले होते.आणि महत्त्वाची बाब ही की,सुरक्षेच्या कारणास्तव त्यांनी मंदिरातील मोदींच्या पुतळ्यासमोर त्यांनी काचही लावली होती.या मंदिरासाठी दीड लाख रुपये मोजले होते.

भाजपचे कार्यकर्ते आणि श्री नमो फाउंडेशनचे मयूर मुंढे मोदींचं मंदिर उभारण्यामागची भावना व्यक्त करताना मुंढे म्हणाले होते,'मी मोदींचा पाठिराखा आणि समर्थक असून त्यांची पूजाही करतो.त्यांचा आशीर्वाद घेतो.या मंदिरामुळे त्यांच्या इतर भक्तांनादेखील आशीर्वाद घेता येईल असंही मुंढे यांनी त्यावेळी म्हटलं होतं.पण प्रचंड चर्चा झाल्यानंतर हे मंदिर हटवण्यात आले.

Mayur Mundhe .jpg
Rahul Gandhi : भाषणाच्या सुरुवातीलाच राहुल गांधींनी मागितली माफी, म्हणाले,'शिवाजी महाराजांची मूर्ती...'

मुंडे पत्रात नेमकं काय म्हणाले..?

ते म्हणाले ,मी अनेक वर्षांपासून पक्षासाठी निष्ठेने काम करत आहे.मी विविध पदांवर प्रामाणिकपणे काम केले आहे.मात्र, भाजप आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करत आहे.इतर पक्षातून येणाऱ्यांना पक्ष महत्त्व देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.आपला जनाधार भक्कम करण्यासाठी ठराविक लोकांनाच संघटनेत पदे दिली जात आहे असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com