BJP on Harshvardhan Patil : 'इथून पुढच्या काळात कोणी पिंडीवरचा विंचू होता कामा नये, याची..' ; भाजप जिल्हाध्यक्षांचं वक्तव्य!

BJP Pune District President Vasudev Kale : हर्षवर्धन पाटील गेल्याने  इंदापुरातून भाजप संपली असे नाही, असंही बोलून दाखवलं आहे.
BJP Pune District President Vasudev Kale
BJP Pune District President Vasudev KaleSarakarnama
Published on
Updated on

Indapur BJP News : हर्षवर्धन पाटील यांना काँग्रेसमध्ये असुरक्षित वाटत होतं, म्हणून त्यांनी भाजपचा आधार घेतला मात्र आता ते गेल्याने  इंदापुरातून भाजप संपली असे नाही. इथून पुढच्या काळात कोणी पिंडीवरचा विंचू होता कामा नये, याची काळजी भाजपच्या वतीने भविष्यकाळात घेऊ. मागील पन्नास वर्षांपासून राजकारणात असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे राजकारण हे अत्यंत विश्वासघातकी आहे. अशा शब्दांमध्ये भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या निशाणा साधला.

      माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे भाजप(BJP)ला सोडचिठ्ठी देत सोमवार (ता.07) रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षात प्रवेश करत आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांनी इंदापुर येथील शासकीय विश्रामगृह येथे रविवारी (ता.06) रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. 

BJP Pune District President Vasudev Kale
Pankaja Munde : हर्षवर्धन पाटलांची भाजपला सोडचिठ्ठी, पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या "आमच्या प्रदेशाध्यक्षांशी…"

   यावेळी बोलताना काळे म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रातून एखादा दुसरा इतर पक्षात प्रवेश झाला तर फार काही आउटगोइंग झाली आहे, अशी परिस्थिती नाही.  स्थानिक परिस्थितीनुसार काहीजण पक्ष प्रवेशाचा निर्णय घेत असतात. राज्यात राष्ट्रवादी, शिवसेना(Shivsena) आणि काँग्रेसचे सरकार असताना सत्तेमधील पक्ष फुटले ही देशाच्या इतिहासातील पहिली घटना होती. शिवसेनेचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शरद पवारांच्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर या राज्यातील लोकांचा विश्वास नाही म्हणून ते बाहेर पडले होते हेच त्यातून स्पष्ट होते. 

 तसेच, मागील दोन दिवसापासून तालुक्यातील अनेक मोठे नेते, कार्यकर्ते भाजपच्या संपर्कात आहेत काहींनी वरिष्ठ नेत्यांशी संपर्क करत भेटी देखील घेतल्या आहेत. तेही भाजपच्या वाटेवर असल्याचेही काळे यांनी यावेळी सांगितले.

BJP Pune District President Vasudev Kale
BJP-Shivsena on Deepesh Mhatre : 'ते' गेले बरेच झाले, भाजपचा सूर ; तर 'त्यांच्या' जाण्याने फरक पडणार नाही शिवसेनेचे म्हणणे!

 याशिवाय, तालुक्यातील जनता भाजप व शिवसेनेच्या काळात विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकांमध्ये आमच्याच पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहिलेली आहे. तालुक्यात भाजपचे प्रभावी अस्तित्व असुन येणारा काळ जरी आव्हानात्मक असला तरी राजकीय स्थितंतराने कार्यकर्त्यांनी गर्भगळीत होता कामा नये. जिल्ह्यात दहा पैकी चार जागा भाजपने लढवाव्यात अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे केलेली आहे. यामध्ये इंदापूरची जागा देखील भाजपला मिळावी असा आमचा आग्रह राहील. मात्र महायुतीने कोणत्याही पक्षाचा उमेदवार दिला तर त्याचे काम पक्ष करेल. असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं.

   इंदापूर तालुका भाजपमधून इतर पक्षात काहींचा प्रवेश होत असल्याने सर्वसामान्यांना संभ्रम निर्माण होत आहे.यामुळे इंदापूर तालुका आणि शहर ग्रामीण भाजपच्या तालुका पदाधिकारी व जिल्हास्तरावरील पदाधिकाऱ्यांची कार्यकारणी बरखास्त करत असल्याची घोषणा करीत येत्या आठ दिवसांमध्ये नवीन रचना केली जाईल असे वासुदेव काळे यांनी स्पष्ट केले.    

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com