Video महायुतीत धुसफूस: अजितदादांना भाजपच्या आशा बुचके यांनी दाखवले काळे झेंडे ; नेमकं काय घडलं

BJP Leader Asha Buchke has shown black flags to dcm ajit pawar: जुन्नरमध्ये एक सरकारी बैठक घेतली जाणार आहे. भाजप आणि शिवसेनेला बैठकीसाठी आमंत्रित केले आहे. त्यांचा राग मनात धरुन आशा बुचके आणि त्यांच्या समर्थकांनी अजित पवार यांना काळे झेंडे दाखवले.
Pune BJP News
Pune BJP NewsSarkarnama
Published on
Updated on

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यात आले. सरकारी कार्यक्रमात डावलत असल्याचा आरोप करीत भाजपच्या माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आशा बुचके (Asha Buchke) यांनी अजितदादांचा निषेध केला. आशा बुचके आणि त्यांच्या समर्थकांना अजित पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

अजित पवार यांची जनसन्मान यात्रा सुरु असताना भाजप आणि शिवसेना नेत्यामध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. या घटनेमुळे येत्या काळात महायुतीमध्ये ठिणगी पडेल का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. यापूर्वी जिल्हा परिषदेत आशा बुचके यांनी अजित पवार यांच्या विरोधात भुमिका घेतली होती.

Pune BJP News
Sanjay Raut: PM मोदींनी 400 जागा जिंकल्या असत्या तर त्यांनी 'या' तीन गोष्टी नक्कीच घडवून आणल्या असत्या!

महायुतीतील घटक पक्षाच्या नेत्यानेच अजित पवार यांच्या विरोधात भूमिका घेतल्याने महायुतीत पुणे जिल्ह्यात सारेकाही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अजित पवार यांची जनसन्मान यात्रा पुण्यात आहे. पुण्यातील नागरिकांशी अजित पवार संवाद साधणार आहे.

अजित पवार यांचा आज शिरुर लोकसभा मतदारसंघात दौरा आहे. जुन्नरमध्ये एक सरकारी बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीचे भाजप आणि शिवसेनेला आमंत्रित केले आहे. त्यांचा राग मनात धरुन आशा बुचके आणि त्यांच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरुन अजित पवार यांना काळे झेंडे दाखवले.

अजित पवार हे पालकमंत्री आहेत, पण ते पालकत्वाची भूमिका बजावत नाहीत, फक्त आमदार अतुल बेनके यांनाच सोबत घेऊन बैठका घेतात. यावर अजित पवारांनी तातडीने माफी मागावी, असं म्हणत आंदोलक आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी अजित पवार यांच्याविरोधात घोषणबाजी करीत राडा केला.

भाजप पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेणार?

भाजपला प्रत्युत्तर देण्यासाठी अजित पवार गटातील पदाधिकारी देखील आक्रमक झाले. दोन्ही पक्षाचे पदाधिकारी समोरासमोर आल्याने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी तातडीने आंदोलनस्थळी धाव घेत आशा बुचके यांच्यासह भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं. या घटनेवर भाजप पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेतात, याकडे सगळ्याचे लक्ष आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com