Pune News : आगामी विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाचले असून उद्या भाजपची पहिली उमेदवारी यादी येण्याची शक्यता आहे. यापूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पुण्यात दाखल झाले असून त्यांच्याकडून संभावित बंडखोरांची समजूत काढली जात असल्याचं समोर आला आहे.
पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप (BJP) आपला उमेदवार देणार असल्याचं जवळपास निश्चित मानला जात आहे. त्या मतदारसंघांमध्ये मोठ्या संख्येने इच्छुक असून त्यांच्यामध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच चालू असल्याचे पाहायला मिळत आहे. एकाला उमेदवारी मिळाल्यानंतर अनेक जण नाराज होणार असल्याने उमेदवार यादी घोषित करण्यापूर्वी हालचालींना वेग आला आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हे पुण्यात दाखल झाल्या असून त्यांच्याकडून विद्यमान आमदार आणि इच्छुकांच्या भेटीगाठी घेण्यात येत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने माजी नगरसेवक दिलीप वेडे पाटील, प्रसन्न जगताप, अॅड. मधुकर मुसळे यांचा समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे.
खडकवासला, पर्वती, शिवाजीनगर आणि कोथरूडमधील विद्यमान आमदाराला संधी न देता नवीन उमेदवार द्यावा अशी या इच्छुकांची मागणी आहे. त्यांची समजूत काढण्याचे काम बावनकुळे यांच्याकडून करण्यात येत आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समवेत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ देखील नाराज इच्छुकांची समजूत काढत असल्याचं समोर आला आहे.
याबाबत बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी अनेक इच्छुक आहेत. त्यामुळे उमेदवारी घोषित होईपर्यंत स्पर्धा असते आणि उमेदवारी घोषित केल्यानंतर देखील ही स्पर्धा सुरूच राहते. इच्छुक जरी खूप सारी असले तरी प्रत्येक इच्छुकाला उमेदवारी देता येत नाही.
त्यामुळे सर्वच इच्छुकांसोबत चहा घेऊन चर्चा करणार आहे. आमचा पक्ष आमची आई आहे. आम्ही तिच्यासोबत प्रतारणा करत नाही. त्यामुळे आमच्या पक्षात बंडखोरी होणार नाही, असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.
जागावाटप आणि उमेदवारी लवकरच जाहीर होईल. जिथे जो उमेदवार जिंकण्याची क्षमता असेन तो लढेल.महायुतीत 90 टक्के जागांच एकमत झालं आहे. काही जागांवर अद्यापही चर्चा सुरू आहे.वडगाव शेरीबद्दल अजून काही निर्णय झाला नाही. महायुतीची अंतिम यादी येईल तेव्हा कोण उमेदवार आहेत, हे तुम्हाला समजेल, असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.