Pune BJP News : पुणे जिल्ह्यात होणार दोन अध्यक्ष; भाजपाकडून पहिल्यांदाच नवा प्रयोग !

Pune District BJP President News : आमदार खासदारांचा कल नेमका कुणाला ?
Pune BJP News : Pune District BJP President News :
Pune BJP News : Pune District BJP President News : Sarkarnama
Published on
Updated on

Pune District BJP President News : राज्यातील शहर व जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या येत्या २० मे पूर्वी पूर्ण करण्यात येतील, असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (ChandraShekhar Bawankule News) यांनी सोमवारी पुण्यात जाहीर केले.त्यामुळे निवडणूक प्रक्रियेसाठी नेमलेल्या प्रभारींची धावपळ सुरू झाली आहे.

कोअर कमिटीतील सदस्यांची चर्चा करून जिल्हाध्यक्षांच्या नेमणुकीबाबत प्रदेशाध्यक्षांना अहवाल देण्याचे काम प्रभारींना करायचे आहे. संबंधित जिल्ह्यातील कार्यकारिणी, पक्षसंघटनेतील अन्य पदाधिकारी व आमदार खासदारांचा कल नेमका कुणाला? याचा अंदाज घेण्याचे प्रमुख काम प्रभारींना करावे लागणार आहे.

पुणे जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचे (BJP) फारसे अस्तित्व नाही. दौंडचे आमदार राहूल कुल (Rahul Kul) वगळता जिल्ह्यात भाजपाचा आमदार नाही. एकेकाळी शिरूर व मावळ या दोन मतदारसंघात भाजपाचे आमदार होते. मात्र, या दोन्ही ठिकाणी भाजपाला यश मिळताना दिसत नाही. मावळ हा तर भाजपाचा पारंपरित मतदारसंघ. या मतदारसंघात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेटवर्क सुरवातीपासून असल्याचे सांगण्यात येते. या मतदारसंघातून २०१४ च्या निवडणुकीत निवडून आलेल्या संजय उर्फ बाळा भेगडे यांचा २०१९ च्या निवडणुकीत दारूण पराभव झाला.

Pune BJP News : Pune District BJP President News :
Pimpri-Chinchwad : वीजबिल न भरणाऱ्यांना 'महावितरण'चा शॉक; १६ हजार ग्राहकांची वीज खंडित

या निवडणुकीआधी काही महिने भेगडे यांना फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात राज्यमंत्री म्हणून स्थान देण्यात आले होते. त्यापूर्वी ते पक्षाचे जिल्हाध्यक्ष होते. त्यानंतर त्यांच्याच जवळच्या गणेश भेगडे यांना जिल्हाध्यक्ष करण्यात आले. गेल्या चार वर्षापासून गणेश भेगडे हेच पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. मावळ तालुक्याकडे गेल्या अनेक वर्षापासून जिल्हाध्यक्षपद आहे. भेगडे यांच्या रूपाने मंत्रीपदही या तालुक्याला देण्यात आले. तरीही गेल्या काही वर्षात भाजपाला सलग पराभवाचा सामना करावा लागत आहे. २०१९ ला आमदारकी गेली. जिल्हा बँकेतही यश मिळाले नाही. नुकत्यात झालेल्या मावळ बाजार समितीतही दारूण पराभवाचा सामना करावा लागला.

जिल्ह्यात होणार दोन अध्यक्ष :

पुणे जिल्ह्यात दोन जिल्हाध्यक्षांची नेमणूक करण्याची पक्षाची तयारी सुरू आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरीसाठी प्रभारी म्हणून काम पाहात आहेत. उत्तर पुणे जिल्ह्यासाठी जुन्नर,आंबेगाव, खेड, शिरूर, हवेली, मावळ तर दक्षिण पुणे जिल्ह्यासाठी मुळशी, भोर, वेल्हा, पुरंदर, बारामती, इंदापूर आणि दौंड अशी रचना करण्यात आली आहे. २० मे पूर्वी शहर व जिल्हाध्यक्षांची निवड होणार आहे.

Pune BJP News : Pune District BJP President News :
Congress News : सातशे मतांनी निवडून येणाऱ्याने नाना पटोलेंना शहाणपणा शिकवू नये, काँग्रेस प्रवक्त्याचा शहाजीबापूंवर हल्लाबोल!

या साऱ्या पाश्‍र्वभूमीवर नवे अध्यक्ष कोण होणार याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे. खेडमधून शरद बुट्टे-पाटील (Sharad Butte Patil), विद्यमान जिल्हा संघटन सरचिटणीस ॲड.धमेंद्र खांडरे व शिरूरमधील आमदारकीचे इच्छुक प्रदीप कंद (Pradeep Kand) यांच्या नावाची चर्चा आहे. बुट्टे-पाटील व ॲड. खांडरे यांच्या नावाची चर्चा आधीपासून आहे. मात्र, प्रदीप कंद यांच्या नावाची चर्चा नव्याने सुरू झाली आहे. राष्ट्रवादीत असताना कंद यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून काम केलेले आहे. त्यांना कामाचा दांडगा अनुभव आहे.

मात्र, आमदारकीच्या उमेदवाराला जिल्हध्यक्षपदात अडकवून ठेवायचे नाही, असे पक्षाचे धोरण आहे. त्यामुळे कंद यांच्या नावाचा विचार होणार का ? अशी चर्चा आहे. दक्षिण पुणे जिल्ह्यात पक्षाकडे आमदार कुल वगळता मोठा चेहरा नाही. मात्र, कंद यांच्यासारखीच आमदार कुल यांची स्थिती आहे. कुल विद्यमान आमदार आहेत.पुढचे उमेदवारदेखील तेच आहेत. त्यामुळे दक्षिण पुण्याचा जिल्हाध्यक्ष कुणाला करायचे हा पक्षापुढे पेच आहे. .

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com