Congress News : सातशे मतांनी निवडून येणाऱ्याने नाना पटोलेंना शहाणपणा शिकवू नये, काँग्रेस प्रवक्त्याचा शहाजीबापूंवर हल्लाबोल!

Congress Criticize On Shahaji Patil : नाना पटोलेंवर केलेल्या टीकेमुळे हणमंत पवार आक्रमक, आमदारकी वाचते की नाही, याचा विचार करा..
Congress News :
Congress News :Sarkarnama
Published on
Updated on

Congress Criticize On Shahaji Patil : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते व आमदार शहाजी पाटील (Shahaji Patil) यांच्यात आरोप प्रत्यारोप होत आहे. नाना पटोले यांनी शहाजी पाटलांवर 'गद्दारातील एक आमदार' अशी टीका केली होती. यावर आता काँग्रेस प्रवक्ते हणमंत पवार यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून शहाजी पाटलांवर टीकेची झोड उठवली आहे. 'तुम्हाला सोंगाड्या म्हणून महाराष्ट्र ओळखतो, तुमची शरीराची उंची वाढली आहे, मेंदूची उंची वाढलीच नाही,' अशा कठोर शब्दात हणमंत पवार यांनी निशाणा साधला आहे.

Congress News :
Shrikant Shinde : ‘आपला दवाखाना’मध्ये करणार राऊतांवर उपचार, अजित पवारांच्या पोटदुखीचेही सांगितले कारण !

व्हिडीओच्या माध्यमातून हणमंत पवार म्हणाले, "सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षध्यक्ष नाना पटोले यांच्यावर कमी बुद्धी असणाऱ्या माणसाला प्रदेशाध्यक्ष म्हणून नेमला, असे अतिशय वाईट वक्तव्य शहाजी पाटलांनी केले. शहाजी पाटलांना मला हे ध्यानात आणून द्यावे लागेल, गणपतराव देशमुख सारख्या अतिशय ऋषितुल्य व्यक्तिमत्वाने ज्यांनी त्या भागाचे प्रतिनिधित्व केलंय, तेथील लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय. तेव्हा तोंड सांभाळून बोला."

पवार पुढे म्हणाले, "तोंड संभाळून बोलत चला. महाराष्ट्राचं राजकारण एकमेकांवर आरोप करत खालच्या पातळीला नेण्याचं कधीच नाही. सांगोला मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करताना याचं भान तुम्हाला असलं पाहिजे. शहाजी पाटील तुम्हाला महाराष्ट्राची जनता गांभीर्याने घेत नाही. तुम्ही लोकांची करमणूक करणारा एक सोंगाड्या म्हणून चर्चेत असता. लोक हसतात तुम्हाला. तुम्ही निखालस पाचखळ कविता करता. तुम्ही गद्दार आहात हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. तुम्ही गद्दारामधले एक आहात, हे नाना पटोंलेनी सांगितलं यात काहीही खोटं नाही. ही टीका तुम्हाला झोंबण्याचं एवढं कारण नाही. तुम्ही कधी काळी काँग्रेसमध्ये होता, हे सांगायला आम्हाला लाज वाटते. "

Congress News :
Health Department Recruitment News : इम्तियाज यांच्या याचिकेला यश, न्यायालयाच्या आदेशाने आरोग्य विभागात मेगा भरती...

या व्हिडीओत पवार पुढे म्हणाले, "तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे उंबरठे झिजवले आहे. तुम्ही नंतर शिवसेनेमध्ये गेलात. आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत शिवसेनेशी गद्दारी करून तुम्ही शिंदे गटात गेलात. तुम्ही आज कुठे आहात हे तुम्हाला माहिती नाही, उद्या कुठे आहात हे ही माहिती नसतं, अशा व्यक्तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तोंडावर खासदारकीचा राजीनामा फेकून स्वाभिमाना बाणा दाखवणाऱ्या माणसाला अक्कल नाही म्हणणं, हे शहाजी पाटील (Shahaji Patil) तुम्हाला शोभत नाही."

Congress News :
Sharad Pawar News: 'रयत'च्या अध्यक्षपदी शरद पवार यांची फेरनिवड

"अवघ्या सातशे मतांनी तुम्ही निवडून आलेला आहात. नाना पटोलेंना शिकवू नका. तुम्ही पुन्हा निवडून येणार की नाही, याची काळजी करा. तुमचे विनोद, तुमचे चाळे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आम्हाला तोंड उघडायला लावू नका, आमच्या प्रदेशाध्यक्षांविषयी बोलताना दहा वेळा विचार करा, हा इशारा आम्ही देत आहोत. तुमची शारीरीक उंची वाढली आहे. तुमच्या मेंदूची उंची वाढलीच नाही. तुमची आमदारकी टिकते का नाही त्याची काळजी करा," असेही हणमंत पवार म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com