Pune Crime News: पाच कोटी फसवणूक प्रकरण : पुण्यातील भाजपच्या माजी नगरसेवकाला मोठा दिलासा

Former Corporator Uday Joshi: उदय जोशी यांच्यासह त्यांचा मुलगा मयूरेश जोशी यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला
Pune BJP
Pune BJP Sarkarnama
Published on
Updated on

Pune News: पुण्यातील भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशी आणि त्यांच्या मुलाविरुद्ध दाखल गुन्ह्यात मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. गॅस एजन्सीमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने तब्बल पाच कोटी 53 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी उदय जोशी आणि मयूरेश जोशी यांच्यावर विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

ठेकेदार मंगेश खरे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली होती. मात्र, आता या प्रकरणामध्ये उदय जोशी यांच्यासह त्यांचा मुलगा मयूरेश जोशी यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

Pune BJP
Maratha Reservation : मराठा बांधव आक्रमक; आमदार रत्नाकर गुट्टेंची अडवली गाडी

तब्बल पाच कोटी 53 लाखांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर उदय जोशी यांनी जामीन मिळवण्यासाठी शिवाजीनगर न्यायालयात अर्ज दाखल केला होता. पण शिवाजीनगर न्यायालयाने हा जामीन अर्ज फेटाळून लावला होता.

यानंतर जोशी यांनी आपल्या वकिलामार्फत मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. यावर न्यायालयाने वैयक्तिक जातमुचलक्यावर जोशी यांच्यासह त्यांच्या मुलाला जामीन मंजूर केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नेमकं प्रकरण काय ?

गॅस एजन्सीमध्ये पैसे गुंतवल्यास चांगले पैसे देण्याच्या आमिषाने उदय जोशी आणि मयूरेश जोशी यांनी फसवणूक केल्या प्रकरणी पुणे पोलिसांकडे अनेकजणांनी तक्रारी दिल्या होत्या. यावरून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कोविडच्या काळात जोशी यांचा गॅस एजन्सीचा व्यवसाय आर्थिक संकटात होता. यावेळी त्यांनी काही जाणांकडून उसने पैसे घेतले होते. पण यामध्ये काही सावकरांचा समावेश होता. मात्र, यातील काही सावकरांनी गॅस एजन्सी ताब्यात घेण्यासाठी मुद्दामहून अशा पद्धतीचे गुन्हे दाखल केले होते, अशी माहिती जोशी कुटुंबांनी दिली आहे.

Edited by : Ganesh Thombare

Pune BJP
PM Narendra Modi Rally: पंतप्रधान मोदींसमोरच तरुणी चढली विजेच्या टॉवरवर; अन्...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com