Sujit Patkar Arrest : कोविड सेंटर घोटाळा प्रकरण : संजय राऊतांना धक्का ; सुजित पाटकरांना मुंबई पोलिसांकडून अटक

Sujit Patkar Arrested by Mumbai Police : किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर मुंबईतील आझाद मैदान पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Sujit Patkar News
Sujit Patkar NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मुंबईतील कथित कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात, मुंबई पोलिसांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांना अटक केली आहे. सुजित पाटकर यांनी 36 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजप (BJP) नेते माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांनी केला होता. सोमय्या यांच्या तक्रारीनंतर मुंबईतील आझाद मैदान पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा करत होती. त्यांनी पाटकर यांना गुरुवारी न्यायालयात हजर केले. यामुळे न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, सुजित पाटकर यांना ईडीने (ED) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात या पूर्वीच अटक केली होती. या कारवाईने शिवसेनेच्या (ठाकरे गट) नेत्यांची धास्ती वाढली असल्याचे बोलले जात आहे. ईडीनंतर मुंबई पोलिसांनी पाटकर यांना दाब्यात घेतल्यामुळे तपासाची चक्र वेगाने फिरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Sujit Patkar News
Jitendra Awhad On Sandip Kshirsagar : '' कभी कभी सैलाब आता है,और...''; मुंडेंविरोधात दंड थोपटत आव्हाडांची क्षीरसागरांना ताकद

पाटकरांची अटक ही संजय राऊत यांच्यासाठी मोठा धक्का असल्याची चर्चा आहे. यामुळे कोविड घोटाळ्याला पुन्हा 'राजकीय' रंग येण्याची चिन्हे आहेत. बीएमसीच्या जंबो कोविड-19 केंद्र चालवण्यासाठी नियुक्त केलेल्या खाजगी कंत्राटदारांनी फसवणूक करून पैसे मिळविण्यासाठी कोविड सेंटरमध्ये दाखल झालेल्या रुग्णांच्या संख्येत फेरफार केल्याचा आरोप ईडीने पाटकर यांच्यावर केला होता.

Sujit Patkar News
Sharad Pawar Beed Sabha : पवारांकडून क्षीरसागरांचे कौतुक, मोदींवर निशाणा ; पण मुंडेंना सोडले..

कोविड सेंटरचे कंत्राट घेतलेल्या लाईफलाईन कंपनीने पेपर्सवर दाखवलेले डॉक्टर्स आता अस्तित्वातच नाहीत, असे ईडी चौकशीतून समोर आल्याची माहिती मिळत आहे. त्या संदर्भात मुंबई पोलिसही तपास करत होते. त्यानंतर पोलिसांनी पाटकर यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, कोविड सेंटर घोटाळ्याच्या आरोपांमुळे मुंबईच्या माजी महापौर किशोरी पडणेकर यांच्यावरही गुन्हा दाखल झालेला आहे. यामुळे ठाकरे गटाची डोखेदुखी वाढली असल्याचे बोलले जात आहे.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com