Boycott Turkish : जम्मू कश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कारवाई केली. तुर्कीने पाकिस्तानला लष्करी ड्रोन आणि शस्त्रास्त्रांची मदत पाठवून पाकिस्तानला खुले समर्थन दिले. यापूर्वी भारताने तुर्कीत भूकंप झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर मदत केली होती, पण तुर्कीने ती मदत विसरून भारताच्या विरोधात भूमिका घेतल्याने देशभरात नाराजी निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर पुण्यात 'बॉयकॉट तुर्की' अभियान सुरू झाले असून पुण्यातील व्यापाऱ्यांनी तुर्कीच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले जात आहे. पुण्यातील व्यापाऱ्यांनी या मोहिमेला पाठिंबा देताना तुर्कीहून आयात होणारे सफरचंद आणणे थांबवले आहे. त्यामुळे स्थानिक बाजारपेठांमधून तुर्की सफरचंद गायब झाले आहेत. याचाच राग मनात धरून आता पाकिस्तानमधून पुण्यातील व्यापाऱ्यांना धमकीचे फोन येत असल्याचं समोर आला आहे.
पुण्यात दरवर्षी अंदाजे १ हजार ते १२०० कोटी रुपयांची सफरचंद विक्री होते. या व्यापारात आता मोठी घट झाली आहे. सफरचंद व्यापारी सुयोग झेंडे यांनी तुर्कीमधील सर्व फळांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असून यापुढे तुर्कीहून कुठलेही फळ आयात न करण्याची भूमिका जाहीर केली आहे.
या निर्णयानंतर झेंडे यांना पाकिस्तानमधून धमकीचे फोन येऊ लागले असून, अज्ञात क्रमांकावरून त्यांना ठार मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. यासंदर्भात बोलताना झेंडे म्हणाले, "गेल्या काही दिवसांत तुर्की सफरचंदांची मागणी मोठ्या प्रमाणावर घटली आहे. नागरिकही या बहिष्कार मोहिमेत सामील झाले असून, तुर्कीच्या ऐवजी इतर देशांमधून सफरचंद खरेदी करत आहेत."
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.