Pune Congress : तब्बल 24 वर्षानंतर शरद पवार पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये : चहापानाचं निमंत्रण स्वीकारलं!

Pune Congress : काँग्रेस वर्धापनदिनानिमित्त चहापानासाठी उपस्थित राहणार..
Pune Congress | Sharad Pawar | Congess anniversary
Pune Congress | Sharad Pawar | Congess anniversarySarkarnama

Pune News : आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा (Congress) वर्धापन दिन आहे. देशभरात काँग्रेसकडून वर्धापन दिन साजरा केला जात आहे. यानिमित्ताने सर्व राज्यात जोरदार तयारी करणयात येत आहे. पुण्यातही काँग्रेसचा वर्धापन दिन साजरा होत आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) उपस्थित राहणार आहेत. पवारांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलंय. पवारांनी हे आमंत्रण स्वीकारलं असून, तब्बल चोवीस वर्षानंतर ते पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये येणार आहेत.

पुण्यातील काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांना आमंत्रित केले आहे. हे आमंत्रण पवारांकडून स्वीकारलं गेलं आहे. यावेळी पुणे काँग्रेसचे पदाधिकारी अरविंद शिंदे म्हणाले, "१८८५ सालापासून आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर, देश घडवण्यासाठी ज्यांनी बलिदान दिले. घराची राखरांगोळी केली. ते महात्मा गांधी, पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल असे अनेक नेते अध्यक्ष झाले. "

Pune Congress | Sharad Pawar | Congess anniversary
Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजनेचा वाद चिघळणार; नागपूरात कर्मचारी आक्रमक

शिंदे पुढे म्हणाले, ज्यावेळी मी शरद पवारांकडे गेलो होतो. त्यांना विनंती केली की, आपणसुद्धा काँग्रेस भवनमध्ये चहापानाला यावं. आज योगायोगाने ते पुण्यातील गणेश कला क्रिडा मंच इथे कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यांनी आमचं आमंत्रण स्वीकारलं. याचसोबत या ठिकाणी शाहू महाराज येणार आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण येणार आहेत. अधिवेशन सुरू असल्यामुळे अनेक आमदार नागपूरमध्ये व्यस्त आहेत. मात्र जेवढ्यांना आम्ही विनंती केली, ते सर्व उपस्थित राहणार आहेत. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, एमआयएम अशा सर्व पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत, असे अरविंदे शिंदे (Arvind Shinde) यांनी सांगितले.

Pune Congress | Sharad Pawar | Congess anniversary
Winter Session News: सत्तारांना पुन्हा आठवला ईश्वर, अल्ला, भगवान..

दरम्यान, शरद पवार हे तब्बल चोवीस वर्षानंतर काँग्रेस भवनच्या ऐतिहासिक वास्तूत उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाल्यानंतर पवार हे पहिल्यांदाच काँग्रेस भवनमध्ये चहापानासाठी येणार आहेत. यामुळे पवार यांच्या उपस्थितीची आता शहरभर चर्चा होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com