Congress Politics : महापालिका निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये मोठी घडामोड, पुणे शहराला मिळणार नवीन शहराध्यक्ष?

Pune Congress PMC Election : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुणे काँग्रेसमध्ये बदल होणार असून नवीन अध्यक्ष मिळणार असल्याची चर्चा आहे.
Congress Politics
Congress PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Pune News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे आता जोरदार वाहू लागले आहेत. नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू असून आता जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांच्या संदर्भात देखील राजकीय पक्षांमध्ये घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत.

अशातच पुणे काँग्रेसमध्ये मोठी घडामोडी होणार असल्याचं बोललं जात आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहराला नवीन शहराध्यक्ष मिळणार असल्याची चर्चा आहे. शहराध्यक्ष बदलाच्या चर्चा गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसमध्ये सुरू होती. मात्र, त्याला पक्षातील वरिष्ठांकडून योग्य प्रतिसाद मिळत नव्हता.

लोकसभा निवडणुकीपूर्वी शहराध्यक्ष बदलाबाबतच्या चर्चांना उधाण आलं होतं, त्यानंतर विधानसभा निवडणुकीदरम्यानही काँग्रेसच्या एका गटाने शहराध्यक्ष बदलण्याची मागणी करत मोठ्या प्रमाणावर लॉबिंग केले होते. मात्र त्यावेळी निवडणूक जवळ असल्याने आणि पक्षात गोंधळ निर्माण होऊ नये म्हणून वरिष्ठ नेत्यांनी या मागणीकडे दुर्लक्ष केले होते.

Congress Politics
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना पुन्हा डिवचले; ‘मी डॉक्टर नाही; पण राजकीय ऑपरेशन सहजपणे करतो’

आता महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असल्याने पुन्हा नेतृत्व बदलाची मागणी लावून धरली आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी कोणतंही नेतृत्व बदल केल्यास त्याचा परिणाम पक्ष संघटनेवर होऊन शकतो याचा विचार करत पक्ष नेतृत्वाने शहराध्यक्ष बदलण्यास स्पष्टपणे नाकार दिला होता. मात्र, आता निवडणुकीला अवघे काही दिवस राहिले असताना पुन्हा एकदा शहराध्यक्ष बदलाबाबतच्या चर्चा काँग्रेसमध्ये सुरू झाल्या आहेत.

ज्या पद्धतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुणे शहरासाठी दोन शहराध्यक्ष निवडण्यात आले आहेत. त्याच पद्धतीने आठ विधानसभा मतदारसंघांपैकी चार-चार विधानसभा मतदारसंघासाठी एक शहर अध्यक्ष निवडण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे.

सध्याचे शहराध्यक्ष असलेल्या अरविंद शिंदे यांच्यावर चार विधानसभा मतदार संघाची जबाबदारी सोपवून उर्वरित चार विधानसभा मतदारसंघासाठी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन शहराध्यक्ष नेमण्याच्या हालचाली सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र ही नियुक्ती महापालिका निवडणुकी पुरती मर्यादित ठेवली जाणारा असून महापालिका निवडणुकीनंतर पुन्हा शहराध्यक्ष निवडला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

'या' नेत्यांची नावे चर्चेत

काँग्रेस शहराध्यक्ष पदासाठी सुनील मुदगल, सुनील मलके, विरेंद्र किराड, गोपाळ तिवारी , अविनाश बागवे, संजय बालगुडे ही नावे गेल्या अनेक दिवसांपासून शहराध्यक्ष पदासाठी चर्चेत आहेत. मात्र वरील पैकी जे महापालिका निवडणुकीत उमेदवार नसतील अशा एखाद्या व्यक्तीला शहराध्यक्षपदाची जबाबदारी देण्याचा विचार पक्षाकडून करण्यात येत आहे. पुढील आठवडाभरात हे नाव देखील जाहीर होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

Congress Politics
BJP action on rebel leaders : बिहारमधील विजयोत्सवात भाजपकडून बंडखोरांवर कारवाई; काहीचं निलंबन, तर काहींना बजावल्या नोटीसा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com