Pune Congress News : 'काँग्रेसमध्ये निष्ठेची हत्या'; धंगेकरांच्या विरोधात बागुलांची मोहीम...

Lok Sabha Election 2024 : काँग्रेसच्या आबा बागुलांचे काँग्रेसच्या विरोधात काँग्रेस भवनात आंदोलन..
Pune Congress News
Pune Congress News Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : काँग्रेस पक्षाकडून निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी आपल्याच पक्षावर केला आहे. पक्ष संघटनेतील निष्ठावंतांना डावलून बाहेरून आलेल्या रवींद्र धंगेकरांना उमेदवारी निर्णयाच्या विरोधात बागुल यांनी काँग्रेस भवनात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापुढे मेणबत्ती लावून प्रतिकात्मक आंदोलन केले. (Latest Marathi News)

पुणे लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी आबा बागुल यांनी प्रयत्न केले होते. मात्र, काँग्रेसने निवडणूक जिंकण्याची क्षमता असणाऱ्या उमेदवारालाच उमेदवारी देण्याचे धोरण अवलंबल्याने कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत आमदार झालेले रवींद्र धंगेकर यांनाच पक्षाचे तिकीट दिले. यामुळे नाराज झालेल्या बागुल यांच्यावर आपल्याच पक्षाविरोधात आंदोलन करण्याची वेळ आली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बागुल (Aba Bagul) यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसच्या राजकीय रणनीतीवर टीका केली. या वेळी त्यांनी महाराष्ट्र प्रदेश स्तरावरील वरिष्ठ नेत्यांवरही टीका केली होती. उमेदवारीबाबत डावलल्याने त्यांनी आज पक्षाचे शहर कार्यालय काँग्रेस भवन येथे प्रतिकात्मक आंदोलन केले. यावेळी बागुल यांनी काँग्रेस पक्षात निष्ठेची हत्या झाली आहे, असे शब्द लिहिलेला शर्टही त्यांनी परिधान केला होता.

माध्यमांशी संवाद साधताना आबा बागूल म्हणाले, "काँग्रेस पक्षात सातत्याने निष्ठावंत कार्यकर्ते-नेत्यांवर अन्याय करण्यात येत आहे. पक्ष संघटनेत आयाराम-गयाराम लोकांना संधी दिली जात आहे. यामुळे पक्षाशी निष्ठावंत राहिलेला कार्यकर्ता भरडला जात आहे. याची दखल पक्षाच्या हायकमांडने घ्यावी. पुण्यातून निष्ठावंत न्याय संघर्ष यात्राही काढली जाणार आहे. जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी काँग्रेस (Congress) संघटनेला निष्ठावंत कार्यकर्त्यांची गरज आहे. त्यांची एकजूट या यात्रेच्यानिमित्ताने होईल."

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com