Baramati News: बारामतीत गोळीबार; काकडे बंधुंवर गुन्हा दाखल

Baramati Bullock Cart Race Dispute Ranjit Nimbalkar Injured: गौतम काकडे यांनी फलटण येथील रणजीत निंबाळकर यांचा शर्यतीचा बैल खरेदी केला होता. हा खरेदी केलेला बैल निंबाळकर हे पुन्हा मागत होते. मात्र याच्यातून त्यांच्यात वाद निर्माण झाला.
Baramati  News
Baramati NewsSarkarnama

Baramati News: बारामतीमध्ये शर्यतीच्या बैल खरेदीच्या व्यवहार सुरु असताना गोळीबार झाल्याची माहिती समोर येत आहे. निंबुत येथे हा गोळीबार झाला. यात एक जण गंभीर जखमी झाला आहे.

याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी गौतम शहाजीराव काकडे व गौरव शहाजीराव काकडे या दोघा भावांसह तीन अनोळखी तरूणांवर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. दोघेही सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे यांची मुले आहेत.या प्रकरणाची अंकिता रणजित निंबाळकर (वय २३) यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.

निंबुत तेथील गौतम काकडे यांच्या घरासमोर हा गोळीबार झाल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. गौतम काकडे यांनी फलटण येथील रणजीत निंबाळकर यांचा शर्यतीचा बैल खरेदी केला होता.

हा खरेदी केलेला बैल निंबाळकर हे पुन्हा मागत होते. मात्र याच्यातून त्यांच्यात वाद निर्माण झाला. रणजीत निंबाळकर हे काल (गुरुवारी) मोठ्या प्रमाणात लोक घेऊन गौतम काकडे यांच्या घरी जबरदस्तीने बैल नेण्यासाठी आले होते.

Baramati  News
Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या गावातील दगडफेकीचे पडसाद शिंगोरी, बोरगावमध्ये...

यावेळी त्यांचा काकडे आणि निंबाळकर यांच्या शाब्दीक चकमक होऊन वाद झाला. या वादात गोळीबार झाला. या गोळीबारामध्ये रणजीत निंबाळकर हे गंभीर जखमी झाले आहेत.

रणजित यांना बारामतीतील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून याप्रकरणी गौरव काकडे व आणखी एकास पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे समजते. वडगाव निंबाळकर पोलिस अधिक तपास करत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com