Pune Crime News : लोहमार्ग पोलीसांनीच प्रवाशांचे पाच लाख लुटले? ; सहा जण निलंबित!

Pune Crime News : पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांना लुबाडणारे सहा पोलिस निलंबित...
Pune Crime News
Pune Crime NewsSarkarnama

Pune Crime News : पुणे रेल्वे स्थानकावर वस्तू तपासणीच्या बहाण्याने प्रवाशांची लूट करणाऱ्या साहाय्यक पोलीस उपनिरीक्षकासह सहा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. यामुळे आता रेल्वे पोलिसांचा लाजीरवाणा कारभार समोर आले आहे. (Pune News)

सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बाळू पाटोळे (एलसीबी, पुणे लोहमार्ग), तसेच पोलिस हवालदार सुनील व्हटकर (एलसीबी, पुणे लोहमार्ग), पुणे लोहमार्ग पोलिस स्टेशनमधील प्रशांत बजरंग डोईफोडे, जयंत गणपत रणदिवे, अमोल युवराज सोनवणे आणि विशाल दत्तात्रेय गोसावी अशी निलंबित करण्यात आलेल्या एकूण रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

Pune Crime News
Sanjay Jagtap News : दिल्लीत महाराष्ट्राचा आमदार असल्याचे सांगायला लाज वाटते; लोक बॅगा पाहतात : जगतापांनी व्यक्त केली खंत

पुणे रेल्वे स्थानकावर काही घातपाती कारवाया घडू नये, यासाठी संशयित प्रवाशांची सामान तपासले जाते. या सहा कर्मचाऱ्यांकडे प्रवाशांचे साहित्य तपासणी करण्याचे काम होते. यांनी तीन एप्रिलच्या दिवशी दुपारच्या सुमारास, एका तरुणासह, त्याच्या सोबतच्या मैत्रिणीला सामान तपासण्यासाठी अडवले. बॅगेत गांजा व तत्सम गोष्टी असल्याच्या शक्यतेवरून त्यांची चौकशी केली गेली. या दोघांना ही रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसमोर हजर करण्यात आले. याची ठाण्यातील डायरीत नोंद करून, त्यांना सोडून दिले.

दरम्यान, रेल्वे पोलिसांनी या तरुण आणि त्याच्या मैत्रिणीकडून एकूण पाच लाख रुपये उकळले, अशी गंभीर स्वरूपाची माहिती, मुंबईच्या लोहमार्ग पोलिस महासंचालक कार्यालयातून रेल्वे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे यांना कळविण्यात आली. आता अधीक्षक बनसोडे यांनी यांनी याप्रकरणी आता चौकशी सुरू केली आहे. याप्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करावे, असा आदेश पोलीस निरीक्षक इरफान शेख यांना देण्यात आले आहे.

Pune Crime News
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा १८१ वर; एकाचा बळी, महापालिका 'अॅक्शन मोड'वर

याप्रकरणी रेल्वे फलाटावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आले. चौकशी झाल्यानंतर पोलीस अधीक्षक बनसोडे यांनी या सहा पोलीस कर्मचाऱ्यांवर पदाचा गैरवर्तन व बेजबाबदारपणा केल्याचा ठपका ठेवला आहे. असा ठपका ठेवून त्यांना सेवेतून निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. या निलंबित कर्मचाऱ्यांपैकी एका कर्मचाऱ्यावर यापूर्वीच जबरदस्तीने चोरी केल्याचा गुन्हा नोंदवला होता. असे असल्यानंतरही त्याची पुन्हा रेल्वे स्थानकात नियुक्ती केल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

उडवाउडवीची उत्तरे :

असा गंभीर प्रकार घडलेला असताना, कोणी वरिष्ठ अधिकारी रजेवर गेले आहेत. तर, कोणाचा प्रशिक्षणासाठी दौरा असल्याचे पुढे आले आहे. पुणे रेल्वे पोलिस स्टेशनमधील कर्मचारी यांना वरिष्ठ अधिकारी कोण आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com