Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा १८१ वर; एकाचा बळी, महापालिका 'अॅक्शन मोड'वर

Pune News : आज एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्याने महापालिका प्रशासन पुन्हा सतर्क झाले आहे.
Pimpri-Chinchwad
Pimpri-ChinchwadSarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : 'कोरोना'ने पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा उचल खाल्याने शून्यावर आलेली रुग्णसंख्या पुन्हा १८१ झाली आहे. त्यात आज एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्याने महापालिका प्रशासन पुन्हा सतर्क झाले आहे.

गेल्या महिन्यात १६ तारखेला 'स्वाईन फ्लू'च्या H3N2 या नव्या विषाणूने उद्योगनगरीत मृत्यू झाला होता. त्यानंतर वीस दिवसांतच कोरोनाच्या ओमीक्रॉन या नव्या व्हेरीएंटने आज बळी गेल्याने पालिका प्रशासन अॅक्शन मोडवर आले आहे. मात्र, नवा कोरोना व्हेरीएंट तथा विषाणू हा घातक नसल्याने ही बाब काहीसी दिलासा देणारी ठरली आहे.

Pimpri-Chinchwad
Abdul Sattar News : कृषीमंत्री सत्तार जत्रेत रमले, रेवड्यांचीही केली खरेदी..

नव्या कोरोना साथीची लक्षणे सौम्य असल्याने रुग्णालयात दाखल होणाऱ्या या रुग्णांची संख्या हाताच्या बोटावर मोजता येईल इतकीच आहे. १८१ पैकी फक्त हे पाच पेशंट हॉस्पिटमध्ये दाखल असून बाकीचे घरीच (होम आयसोलेशन) उपचार घेत आहेत.

Pimpri-Chinchwad
Market Committee News : शेतकऱ्यांना निवडणूक लढण्याची संधी दिल्याने अर्जांचा अक्षरशः पाऊस..

काल शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान ८९ वर्षीय वृद्धाचा कोरोनाने मृत्यू झाला. श्वसन आजाराकरिता ३१ जानेवारीला त्यांना सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

सर्दी, खोकला, घसादुखी, ताप ही लक्षणे असल्यास लगेचच नजीकच्या पालिकेच्या दवाखाना/रुग्णालयामधील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड पालिकेचे वैद्यकिय विभागप्रमुख तथा सहाय्यक आरोग्य, वैद्यकिय अधिकारी डॉ.लक्ष्मण गोफणे यांनी केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com