

Pune News : कुख्यात गुंड निलेश घायवळला धक्का देणारी मोठी बातमी समोर आली आहे. त्याच्यावर आतापर्यंतची सर्वात कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. निलेश घायवळला न्यायालयासमोर हजर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. परंतू तो कोथरुड येथील गोळीबार प्रकरणानंतर विदेशात पळून गेला आहे.
पोलिसांनी या प्रकरणात त्याच्या साथीदाराच्या घरातून तब्बल 400 काडतुसे शोधून काढले होते. यामध्ये 200 जिवंत तर 200 काडतुसे वापरल्याची माहिती समोर आली होती. पोलिसांच्या हाती त्यांच्या पुंगळ्या लागल्याची माहिती होती. त्यानंतरही पोलिसांचा सखोल तपास सुरु होता. घायवळ याच्याबाबत तपासातून नवनवीत माहिती समोर येत आहे. त्यामुळे त्याचा पाय आणखी खोलात जाताना दिसत आहे. त्यामुळे आता त्याच्याविरोधात मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.
निलेश घायवळ याची मालमत्ता जप्त होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या व्यक्तीचं नाव वापरून सिमकार्ड खरेदी करून त्याचा वापर केल्याप्रकरणी घायवळवर गुन्हा दाखल झाला होता. या याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यामध्ये गुरूवारी (ता.11) पुणे पोलिसांकडून न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आलं आहे.
कोथरूड गोळीबार प्रकरणात बनावट कागदपत्रांद्वारे पारपत्र मिळवून लंडनला पलायन केलेला कुख्यात गुंड नीलेश घायवळ याला पुणे येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने फरार घोषित केले आहे. न्यायाधीश के. पी. जैन-देसर्डा यांनी हा निकाल दिला.
किरकोळ वादातून एका तरुणावर गोळीबार केल्याप्रकरणी घायवळ परदेशात पसार झाला होता. त्याने 90 दिवसांचा व्हिसा मिळवला आहे. याबाबत ब्रिटन उच्चायुक्तालयाशी झालेल्या पत्रव्यवहारानंतर घायवळ सध्या लंडनमध्येच असल्याचे स्पष्ट झाले असून, घायवळ हा व्हिजिटर व्हिसावर लंडनमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यानुसार पोलिसांनी घायवळ याला फरार घोषित करण्यात यावे, असा अर्ज न्यायालयात दाखल केला होता.
पोलिसांचा अर्ज मंजूर झाल्याने आता त्याच्या प्रत्यर्पणाच्या प्रक्रियेला गती आली असून, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून घायवळला लवकरच देशात आणले जाईल. कोथरूड पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात घायवळ टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. घायवळचा व्हिसा फेब्रुवारी 2026 पर्यंत वैध आहे.
घायवळ देश सोडून जाऊ नये यासाठी त्याला पोलिसांनी सुरुवातीला ‘लूक आउट’ नोटीस बजाविली होती. त्यानंतर घायवळला शोधून त्याला अटक करून प्रत्यार्पण प्रक्रियेसाठी ‘रेड कॉर्नर’ नोटीस बजाविण्यात आली होती, तर नुकतीच पुणे पोलिसांनी घायवळचा ठावठिकाणा, हालचाली आणि त्याच्याबद्दलची अतिरिक्त माहिती मिळवण्यासाठी ‘ब्लू कॉर्नर’ नोटीसदेखील बजावली आहे. निलेश घायवळ याला न्यायालयाने फरार घोषित केल्याने त्याची मालमत्ता जप्त करणे शक्य होणार आहे,' असे परिमंडल तीनचे उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.