Ram Shinde Vs Rohit Pawar : अजितदादांपूर्वीच रोहित पवारांनीच बांधले होते गुडघ्याला बांशिंग? राम शिंदेंच्या विधानाने खळबळ

Sunil Shelke And Ram Shinde आमदार सुनील शेळकेंच्या आरोपांना राम शिंदेंचा दुजोरा
Rohit Pawar, Ram Shinde
Rohit Pawar, Ram ShindeSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar Political News : राष्ट्रवादी फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांविरोधात रान उठवणाऱ्या शरद पवार गटातील आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप होत आहेत. अजितदादांआधीच रोहित पवार भाजपमध्ये येण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते, असे आमदार सुनील शेळकेंनंतर राम शिंदेंनीही केला आहे.

सुनील शेळकेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्याआधीच आमदार रोहित पवार भाजपात जाण्याच्या तयारीत होते, असा गौप्यस्फोट शुक्रवारी केला. यानंतर भाजप आमदार राम शिंदे यांनीही त्यास दुजोरा देत रोहित पवारांवर निशाणा साधला आहे. शेळके आणि शिंदेंच्या या आरोपांना रोहित पवार काय उत्तर देणार, याकडे लक्ष आहे.

Rohit Pawar, Ram Shinde
Damaji Sakhar Karkhana : 'दामाजी'तून दोनशे कोटी कर्जाच्या आरोपांचा धूरच धूर! काय आहे प्रकरण?

बंडानंतर अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले. पक्षातील अनेक बिनीचे शिलेदारांनी अजित पवार गटात जाणे पसंद केले, असले तरी रोहित पवारांनी शरद पवारांची साथ देण्यास प्राधान्य दिले. यानंतर रोहित यांनी फुटीरांच्या मतदारसंघात जाऊन अजित पवार गटासह भाजपवरही सडकून टीका करत आहेत. अशा वातावरणात शेळके आणि शिंदेंनी केलेल्या आरोपांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली आहे.

राम शिंदे म्हणाले, 'रोहित पवारांनी २०१७ साली त्यांनी राष्ट्रवादीला जिल्हा परिषदेच्या तिकिटासाठी भाजपात जाण्याची धमकी दिली. त्यानंतर २०१९ साली हडपसरसाठी भाजपकडे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना भेटून हडपसर आणि शिवाजीनगर विधानसभेचे तिकीट मिळवण्यासाठी गेले होते,' हा गौप्यस्फोट करून राम शिंदेंनी एकच खळबळ उडवून दिली. पवार घरातील एकजण फुटल्याने आपली अडचण होईल, हे लक्षात आल्यानंतर राष्ट्रवादी नेत्यांनी त्यांना कर्जत-जामखेड मतदातसंघांचे तिकीट दिल्याचेही शिंदेंनी स्पष्ट केले.

'अजित पवार हे तीस वर्षांपासून राजकारण करत आहेत. त्यामुळे ते राज्यातील मोठे नेते झाले आहेत. आपल्यात तेवढी क्षमता आहे का? हे ओळखून रोहित पवारांनी वक्तव्य करावीत,' असा टोलाही राम शिंदे यांनी लगावला आहे. 'कोणाच्या कपाळाला कपाळ घासून यश मिळत नाही,' असा खोचाक सल्लाही त्यांनी रोहित पवार यांना दिला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Rohit Pawar, Ram Shinde
Ram Shinde Secret Explosion : रोहित पवारांनी २०१९ मध्ये चंद्रकांतदादांना भेटून हडपसरमधून भाजपचे तिकिट मागितले होते; राम शिंदेंचा गौप्यस्फोट

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com