PDCC Bank : अजितदादांच्या निधनानंतर पुणे जिल्हा बँकेची पहिलीच निवडणूक : अधिकाऱ्यांचे आदेश धडकताच गुप्त हालचालींना सुरुवात

PDCC Bank : पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सहकारी सोसायट्यांमध्ये प्रतिनिधी निवडीचे ठराव होत असून, ‘अ’ गटातून संचालक होण्यासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
Pune DCC Bank Election
Pune DCC Bank Electionsarkarnama
Published on
Updated on

PDCC Bank : दिवंगत अजित पवार यांच्या निधनाला एक वर्ष पूर्ण होत असतानाचा त्यांचे प्राबल्य असणाऱ्या पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. जिल्ह्यात ठिकठिकाणी सहकारी सोसायटी संस्थांचे प्रतिनिधी निवडीचा ठराव करण्यास सुरुवात झाली आहे. आपल्या तालुक्यातून 'अ' गटातून संचालक होण्यासाठी बँकेच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी पडद्यामागून हालचाली सुरू केल्या आहेत.

अजित पवार यांच्या निधनाला 28 जानेवारी रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. त्याच जानेवारी महिन्यामध्ये जिल्हा बँकेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांनी २१ ऑगस्ट रोजी सर्व सहकारी सोसायटी सचिवांना ठराव पाठवण्याचे आदेश दिले आहेत. २२ सप्टेंबर ही ठराव पाठवण्याची अंतिम तारीख आहे. या ठरावाच्या निमित्ताने सर्व सहकारी संस्थांमध्ये मतदान होणार आहे. त्यामुळे संचालक मंडळाचे महत्व वाढले आहे.

ठराव पाठवण्याची निवडणूक म्हणजे संभाव्य संचालक मंडळाच्या दृष्टीने अंतिम सामन्यापूर्वीचा उपांत्य सामना आहे. सोसायटीमध्ये आपल्या विचाराचा ठराव असावा, यासाठी जिल्हा बँकेच्या आजी-माजी संचालक व तालुका पदाधिकाऱ्यांनी हालचाली सुरू केलेल्या आहेत. ठरावाच्या निमित्ताने अनेक सहकारी संस्था संचालकांमध्ये आपल्या विचाराचा प्रतिनिधी जाण्यासाठी तीव्र स्पर्धा लागणार आहे.

Pune DCC Bank Election
PMC News: डीजेच्या वादानंतर पुण्यात आता नवा संघर्ष! ‘या’ मुद्द्यावरून शिवसेनेनं केली महापालिकेची कोंडी

थकबाकीदार सोसायट्यांना धक्का

ठराव पाठवताना थकबाकीदार सोसायटीच्या अध्यक्ष व संचालकांना प्रतिनिधी म्हणून येण्याचा अधिकार राहिलेला नाही. त्याऐवजी संबंधित संस्थेचा थकबाकी नसलेल्या सभासदाला प्रतिनिधी म्हणून पाठवावे, असे अधोरेखित केले आहे. त्यामुळे अनेक दिग्गज संस्थाचालकांच्या प्रतिनिधींना जाता येत नसल्याने पंचाईत होऊन बसली आहे.

Pune DCC Bank Election
Hinjewadi Traffic : आयटीयन्सच्या वाहतूक कोंडीतून होणार सुटका! हिंजवडीच्या प्रलंबित प्रश्नांसाठी विशेष ‘टास्क फोर्स’, अंतर्गत रस्त्यांसाठी ४२६ कोटी

प्रतिनिधी जाताना आपल्याच कुटुंबातील पत्नी, मुलगा, मुलगी, नातेवाईक व जवळचा विश्वासू कार्यकर्ता यांचा ठराव पाठवण्यासाठी संस्थाचालक प्रयत्न करताना दिसतील, असा अंदाज आहे. दौंड तालुक्यामध्ये १२१ सहकारी संस्था असून, त्यापैकी फक्त तीन सोसायटींची १०० टक्के वसुली झाली आहे. या तीन संस्थांच्या संचालक मंडळापैकी प्रतिनिधी येताना दिसतील. इतर ठिकाणी सभासद प्रतिनिधी येणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com