Hinjewadi Traffic : आयटीयन्सच्या वाहतूक कोंडीतून होणार सुटका! हिंजवडीच्या प्रलंबित प्रश्नांसाठी विशेष ‘टास्क फोर्स’, अंतर्गत रस्त्यांसाठी ४२६ कोटी

Hinjewadi IT Park Traffic Task Force : हिंजवडी आयटी पार्क परिसरातील अंतर्गत रस्त्यांच्या विकासासाठी ४२६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.त्यामुळे वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका होणार असल्याची चर्चा आहे.
IT employees to get relief from Hinjewadi traffic through new road projects
IT employees to get relief from Hinjewadi traffic through new road projectssarkarnama
Published on
Updated on

Pune News : हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाढती वाहतूक कोंडी, अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था, मेट्रोशी जोडणी, सार्वजनिक वाहतूक, पाणीपुरवठा आणि अन्य पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर एकात्मिक उपाययोजना करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची पहिली बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली.

हिंजवडी आयटी पार्क परिसरातील अंतर्गत रस्त्यांच्या विकासासाठी ४२६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) आणि पीएमआरडीए यांनी याबाबत तातडीने कार्यवाही सुरू करावी. तसेच ज्या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या अधिक आहे, तेथे आवश्यक कामे प्राधान्याने सुरू करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. त्यामुळे लवकरच आयटीयन्सची वाहतूक कोंडीतून सुटका होणार असल्याची चर्चा आहे.

या बैठकीस आमदार शंकर मांडेकर, आमदार बाबाजी काळे, अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, पिंपरी-चिंचवड महानगर पोलीस (वाहतूक विभागाचे )उपायुक्त विक्रांत देशमुख तसेच हिंजवडी, मान व वारुंजी गावांतील नागरिक उपस्थित होते

हिंजवडीतील वाहतूक प्रश्नावर केवळ रस्ते दुरुस्ती न करता मेट्रो, सार्वजनिक वाहतूक, पादचारी, सायकल आणि लास्ट-माईल कनेक्टिव्हिटी यांचा समन्वय साधणारी वाहतूक व्यवस्था विकसित करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. मेट्रो स्थानकांपासून आयटी कंपन्या, निवासी सोसायट्या आणि स्थानिक गावांपर्यंत नागरिकांना सुरक्षित व सुलभपणे पोहोचता यावे, यासाठी जोडरस्ते आणि विविध वाहतूक सुविधांचे जाळे उभारण्याचा प्रस्ताव आहे.

IT employees to get relief from Hinjewadi traffic through new road projects
Chakan Traffic News: चाकणच्या ट्रॅफिक कोंडीवर मास्टरप्लॅन; फडणवीस सरकारचं मोठे पाऊल

रस्त्यांचा विकास प्रस्तावित

हिंजवडी परिसरातील मेट्रो स्थानकांशी जोडणीसाठी सुमारे १९.१ किलोमीटर लास्ट-माईल कनेक्टिव्हिटी रस्त्यांचा विकास प्रस्तावित आहे. यामध्ये पीएमआरडीए क्षेत्रातील सुमारे ७.२२५ किलोमीटर आणि एमआयडीसी क्षेत्रातील सुमारे ११.९७४ किलोमीटर रस्त्यांचा समावेश आहे. मेट्रो स्थानकांभोवतीच्या या रस्त्यांचा विकास करताना केवळ वाहनांची वाहतूक न पाहता पादचारी आणि सायकलस्वारांसाठी स्वतंत्र व सुरक्षित सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे.

लास्ट-माईल कनेक्टिव्हिटीअंतर्गत मेट्रो स्थानकांपासून साधारण ५०० मीटर ते १.५ किलोमीटर परिसरातील जोडरस्ते विकसित करण्यात येणार आहेत. पक्के फुटपाथ, सायकल ट्रॅक, टॅक्टाइल मार्ग, सुरक्षित रस्ता ओलांडण्याची व्यवस्था, स्ट्रीट लाइट आणि दिशादर्शक फलक उभारण्याचा प्रस्ताव आहे. दिव्यांग नागरिकांसाठीही हे मार्ग सुलभ असतील, याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.

अनधिकृत पार्किंग कारवाई होणार

मेट्रोचा वापर वाढविण्यासाठी स्थानकांशी जोडलेल्या रस्त्यांवर बस थांबे, शटल/फीडर बस सुविधा, ऑटो स्टँड आणि बस बे विकसित करण्याबरोबरच सार्वजनिक सायकल शेअरिंगसारख्या सुविधांचाही विचार करण्यात आला आहे. मेट्रो स्थानकांजवळ नियोजित पार्किंग व्यवस्था निर्माण करून रस्त्यांवरील अनधिकृत पार्किंगमुळे होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यावरही भर देण्यात येणार आहे.

या रस्ते विकासामध्ये पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी स्टॉर्म-वॉटर ड्रेनेज, पाणी व सांडपाणी वाहिन्यांचे योग्य नियोजन, विद्युत व ऑप्टिकल फायबर केबलसाठी स्वतंत्र युटिलिटी कॉरिडॉर तसेच गॅस पाइपलाइनसाठी आवश्यक जागेचे नियोजन करण्याचा समावेश आहे. त्यामुळे भविष्यात रस्ते वारंवार खोदण्याची वेळ येऊ नये आणि सर्व सेवा एकात्मिक पद्धतीने विकसित करता याव्यात, याची दक्षता घेतली जाणार आहे.

IT employees to get relief from Hinjewadi traffic through new road projects
Chakan MIDC : एकनाथ शिंदेंच्या अजेंड्यावर चाकणची वाहतूक कोंडी! मैदानात उतरून घेतला आढावा; मोठ्या घोषणा अन् पायाभूत सुविधांवर भर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com