Ajit Pawar News: पालकमंत्री होताच अजित पवार 'अ‍ॅक्शन मोड'वर; पिंपरी-चिंचवडमधील कामांचा 24 तासांत घेतला आढावा

Ajit Pawar takes charge of Guardian Minister of Pune : अजित पवार पालकमंत्री झाले अन् लगेच पिंपरी-चिंचवडमधील प्रश्नांचा आढावा घेतला
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pimpri News: पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार यांनी शुक्रवारी सूत्रे घेताच दिवसभर बैठकांचा धडाका लावला. तो शनिवारीही सुरूच होता. पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये प्रथम पिंपरी-चिंचवड आणि नंतर पुणे महापालिकेची आढावा बैठक त्यांनी घेतली. दीर्घकाळ शहरासाठी उपयुक्त असणाऱ्या कामांना प्राधान्य द्या, असा आदेश त्यांनी या वेळी दिला.

उद्योगनगरीतील पाणी, ड्रेनेज, ट्राफिकच्या समस्येसह शहरातील विविध प्रलंबित विकासकामांचा आढावा घेत ही कामे लगेच मार्गी लावण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले. प्रमुख प्रकल्पांची स्थिती, प्रलंबित कामे, पाणीटंचाई, ड्रेनेज आणि वाहतुकीची समस्या, स्वच्छतेसह विविध विषयांची माहिती घेऊन त्यावर चर्चा केली.

Ajit Pawar
Anil Bhosale News : अनिल भोसलेंच्या कुटुंबीयांना अजित पवारांनी भेट नाकारली

विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्यासह पिंपरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार अण्णा बनसोडे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे व इतर पदाधिकारीही या वेळी उपस्थित होते.

रखडलेली कामे तत्काळ मार्गी लावताना कोणतीही चुकीची कामे खपवून घेतली जाणार नाहीत. त्याला मंजुरी देणार नाही, असा इशारा पवार यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना या वेळी दिला. त्यामुळे अनेक प्रकल्प मार्गी लागण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

शहरवासीयांच्या समस्या सोडवितानाच भविष्याचा विचार करून विकासकामांचे नियोजन करण्यासही त्यांनी सांगितले. पालिका रुग्णालयात औषधे आणि सुविधांत त्रुटी राहणार नाही, याची दक्षता घेण्यास त्यांनी नुकत्याच राज्य़ात झालेल्या रुग्णालयातील घटनेच्या पार्श्वभूमीवर बजावले.

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी-निगडी कॉरिडॉर प्रकल्पाची माहिती पवारांनी घेतली. ते म्हणाले, रस्त्याच्या बाजूला दोन झाडांच्यामध्ये अधिक जागा असल्यास तेथे वृक्षारोपण करावे, तेथे स्थानिक प्रजातीची झाडे लावावी, फूटपाथवरील अतिक्रमण काढावे, देखभाल दुरुस्ती चांगल्या पद्धतीने होण्यासाठी उत्तम दर्जाची सामग्री वापरावी, पवना धरण भरले असले तरी आतापासून पाण्याचे योग्य नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी केल्या.

Edited By- Ganesh Thombare

Ajit Pawar
Beed NCP News: आमदार क्षीरसागरांच्या सोबतीला आता शिलेदारांची फौज; पदाधिकाऱ्यांवर सोपवल्या नव्या जबाबदाऱ्या

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com