Anil Bhosale News : अनिल भोसलेंच्या कुटुंबीयांना अजित पवारांनी भेट नाकारली

Pune Politics : माजी आमदार अनिल भोसले हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते.
Anil Bhosale-Ajit pawar
Anil Bhosale-Ajit pawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेच्या गैरव्यवहारप्रकरणी कारागृहात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अनिल भोसले यांच्या कुटुंबीयांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट नाकारली आहे. भोसले यांच्या पत्नी आणि त्यांचा मुलगा हे पवार यांना भेटण्यासाठी सर्किट हाऊसला आले होते. मात्र, उपमुख्यमंत्र्यांनी भेट नाकारल्याची चर्चा पुण्यात जोरात रंगली आहे. (Ajit Pawar refused to visit Anil Bhosle's family)

माजी आमदार अनिल भोसले यांना शिवाजीराव भोसले बॅंकेच्या ७१ कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी २५ फेब्रुवारी २०२० रोजी अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते तुरुंगात आहेत. या प्रकरणात भोसले यांच्या पत्नी रेश्मा भोसलेही सहआरोपी आहेत. मात्र, रेश्मा भोसले यांना जामीन मिळालेला आहे. मात्र, भोसले हे येरवडा कारागृहात आहेत.

Anil Bhosale-Ajit pawar
Pimpri BJP News : पिंपरीत भाजपला मोठा धक्का; प्रदेश प्रवक्ते ठाकरेंच्या गळाला, २५ तारखेला शिवबंधन बांधणार?

अनिल भोसले हे प्रकृतीच्या कारणामुळे पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र, ललित पाटील याच्या प्रकरणामुळे ससून रुग्णालयातील अनेक रुग्णांना पुन्हा येरवडा कारागृहात हलविण्यात आले आहे. त्यात माजी आमदार अनिल भोसले यांचाही समावेश आहे. त्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली आहे का, अशीही चर्चा सुरू आहे. या भेटीमागचे नेमके कारण मात्र कळू शकलेले नाही.

दरम्यान, माजी आमदार अनिल भोसले हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. मात्र, भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या काळात हे भाजप नेत्याकडे झुकल्याने अजित पवार हे नाराज होते. तसेच, पुणे महापालिकेच्या मागील म्हणजेच २०१७ मधील निवडणुकीत रेश्मा भोसले यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिकीट नाकारण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवून विजय मिळविला होता. तेव्हापासून भोसले कुटुंबीय अणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये अंतर पडले होते.

Anil Bhosale-Ajit pawar
Kolhapur Politics : बावनकुळेंनी निष्ठावंतांची समजूत घातली; पण नव्यांच्या शक्तिप्रदर्शनाने टेन्शन वाढविले

पुण्याचे पालकमंत्री बनताच अजित पवार यांनी बैठकांचा धडाका लावला आहे. आजच्या बैठका नियोजित नसतानाही अजित पवार हे अधिकाऱ्यांना बोलावून चर्चा करत आहेत. विकासकामांबरोबरच पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थासंदर्भातही ते संबंधित अधिकाऱ्यांशी बोलत आहेत.

Anil Bhosale-Ajit pawar
Shiv Sena MLA Disqualification : दोन महिन्यांत निर्णय घ्या, न्यायालयाचा अपमान होऊ नये; सरन्यायाधीश चंद्रचूडांनी सुनावले !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com