Pune News: पुणे शहरात वर्षभरात कुत्र्यानं चावा घेतल्याच्या तब्बल 30 हजार घटना; महापालिका 'अ‍ॅक्शन मोड'वर, तब्बल 25 लाख खर्च करणार

PMC News: गेल्या वर्षी पुणे शहरात कुत्र्यानं चावा घेतल्याच्या तब्बल 30 हजार 613 घटना घडल्याची माहिती समोर आली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता भटक्या कुत्र्यांची संख्या मोजण्यासाठी तब्बल 25 लाखांचं टेंडर जारी करण्यात आलं आहे. या निविदेची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.
Street Dog jpg
Street Dog.jpgSarkarnama
Published on
Updated on

Pune News: गेल्या काही महिन्यांमध्ये पुणे शहरात भटक्या कुत्र्‍यांच्या चावा घेण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. तसेच काही ठिकाणी चिमुरड्यांसह नागरिकांवरही भटक्या कुत्र्यांनी हल्ला चढवल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे. अशातच आता पुणे महानगरपालिकेनं मोठा निर्णय घेतला आहे.

पुणे महापालिकेकडून आता शहरातील भटक्या कुत्र्यांची गणना करण्यात येणार आहे. यासाठी महापालिका तब्बल 25 लाख मोजणार आहे. यासाठी पुणे महापालिकेनं 25 लाख रुपयांची निविदा काढली आहे. या निविदेची पुण्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

गेल्या वर्षी पुणे शहरात कुत्र्यानं चावा घेतल्याच्या तब्बल 30 हजार 613 घटना घडल्याची माहिती समोर आली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता भटक्या कुत्र्यांची संख्या मोजण्यासाठी तब्बल 25 लाखांचं टेंडर जारी करण्यात आलं आहे. या टेंडरची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.

पुणे महापालिकेकडून शहर हद्दीतील मोकाट कुत्र्यांची संख्या मोजली जाणार आहे. तसेच महापालिकेकडून काढण्यात आलेल्या निविदेत खासगी संस्थेची नियुक्ती, अ‍ॅप्लिकेशन व आणि गणना करणे अशी निविदा जारी करण्यात आली आहे. दर 5 वर्षांनी शहरातील भटक्या कुत्रे मोजण्यासाठी निविदा काढण्यात येते.

Street Dog jpg
BJP Politics: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीतील बड्या पक्षाची झोप उडवणार? भाजपनं अखेर डाव टाकला

यंदाही महापालिकेनं हे टेंडर काढलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे यावर्षी प्रथमच एक मोबाईल अ‍ॅप्लिकेशन तयार केलं जाणार आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून शहरातील वॉर्ड किंवा प्रभागनिहाय कुत्र्यांची संख्या निश्चित केली जाणार आहे.

पुणे महापालिकेकडून कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी त्यांना पकडून त्यांच्यावर नसबंदी शस्त्रक्रिया केली जाते. त्यानंतर ते पकडलेल्या ठिकाणी परत सोडले जातात. या कामासाठी वेगवेगळ्या संस्थांची नियुक्ती केली जाते. तसेच पुणे महापालिकेकडून यापूर्वी 2023 पूर्वी 2018 मध्ये शहरातील भटक्या कुत्र्यांची गणना करण्यात आली होती.

Street Dog jpg
Land Compensation : शेतकऱ्यांना मोबदला न देणाऱ्या PWD ला न्यायालयाचा दणका, कार्यालयावर जप्ती; मोठ्या कारवाईने प्रशासकीय वर्तुळात खळबळ

पुणे शहर महानगरपालिकेत 32 गावांचा अधिकृतपणे समावेश करण्यात आला होता. या गावांचा समावेश झाल्यापासून पुन्हा एकदा महापालिका शहरातील भटक्या कुत्र्यांची नवी जनगणना करणार आहे. या गणना कार्यक्रम पुढील वर्षभर सुरू राहणार आहे. त्यासाठी 25 लाख रुपये खर्च येण्याची शक्यता आहे.

अलिकडच्या काळात पुणे महानगरपालिकेच्या कारभाराची पुन्हा एकदा चर्चेत आला. मुसळधार पाऊस सुरू असतानाही पौड व कर्वे रस्त्यावर असलेल्या दुभाजकावरील झाडांना टँकरनं पाणी घालत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

तर दुसरीकडे शहरातील मुकुंदनगर व सॅलिसबरी पार्क परिसरात असलेल्या आदिनाथ सोसायटीच्या पाठीमागं भर पावसात भिंतींना रंगकाम व चुना लावण्याचं काम सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आले होते. पण दिलेला पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याचं दिसून आलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com