

Pune News: पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर नगरपरिषद निवडणुकीने राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याचे कारणही तसेच आहे. नगरपरिषद निवडणूक सर्वच पक्षांनी आपले उमेदवार मैदानात उतरले आहे. आज अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे. तिकीट नाकारलेल्या काही कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली आहे. त्यांची मनधरणी करण्यात वरिष्ठ नेत्यांचा कस लागत आहे. अशातच धक्कादायक माहिती समोर येत आहे.
सर्वच प्रभागात अनेक उमेदवार रिंगणात असल्याने राजगुरुनगर नगरपरिषदेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्याता धूसर आहे, पण ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गावकऱ्यांनी शक्कल लढवली आहे. उमेदवारीसाठी चक्क लिलाव केला जात आहे. तिकीटासाठी बोली लावण्यात आली आहे. राजगुरुनगर येथील राजकारण नेहमी गावकी आणि भावकीभोवती फिरत असते.
ज्याची बोली जास्त त्यालाच पाठिंबा देणार असल्याची निर्णय गावकऱ्यांनी घेतला असल्याची माहिती आहे. नगरसेवक पदासाठी सर्वसाधारण जागेसाठी 1 कोटींची बोली लावण्यात आली आहे.तर महिला राखीव जागेसाठी 22 लाखाचा आकडा फुटला आहे. या लिलावातून मिळणारा पैसा गावाचा विकासासाठी खर्च करणार असल्याचे गावकारभाऱ्यांनी सांगितले.
या लिलावातून जमा होणारा पैसा मंदिरासाठी, गावातील सार्वजनिक इमारतींच्या दुरुस्तीसाठी वापरण्यात येणार असल्याचे गावकऱ्यांचे नियोजन आहे. या लिलावाकडे निवडणूक आयोग, सत्ताधारी आणि विरोधक काय भूमिका घेतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. सध्या तरी निवडणूक आयोग आणि पक्षनेत्यांनी मौन धारण केल्याचे दिसते.
राजगुरुनगर नगरपरिषदेच्या 21 नगरसेवकपदासाठी तब्बल 165 अर्ज दाखल झाले आहेत, तर अध्यक्षपदासाठी 11 अर्ज दाखल झाले आहेत. राज्याच्या सत्तेत असलेल्या भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून अध्यक्षपदासह सर्व जागांवर उमेदवार देण्यात आले आहेत.
महायुतीचे घटकपक्ष असलेल्या भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातच चुरशीचा सामना रंगणार असल्याची चित्र सध्या तरी आहे. आज सांयकाळपर्यंत कोण अर्ज मागे घेणार यानंतर निवडणुकीची पुढील रणनीती ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.