Pune Ganesh Festival : आवाजाची मर्यादा ओलांडली तर कायदेशीर कारवाई होणार

उद्या (ता.९) सकाळी दहा वाजता प्रथेप्रमाणे महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्यापासून मुख्य विसर्जन मिरवणुकीस सुरुवात होईल.
ganesh Fastival pune
ganesh Fastival puneSarkarnama

पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीत आवाजाच्या मर्यादेबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांविरोधात कडक कारवाईचा इशारा पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Police Commissinoer Of Pune Amitabh Gupta) यांनी दिला आहे. गणेश विसर्जन मिरवणूक वेळत संपविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आयुक्त गुप्ता यांनी सांगितले.

ganesh Fastival pune
मित्रपक्षांची उणीव भरून काढण्यासाठी भाजपचा 'प्लॅन' तयार..'या' पंचसुत्रीवर कामही सुरू

उद्या (ता.९) सकाळी दहा वाजता प्रथेप्रमाणे महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्यापासून मुख्य विसर्जन मिरवणुकीस सुरुवात होईल. विसर्जन मिरणूक शांततेत व सुरळीत पार पडावी, यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे गुप्ता यांनी सांगितले.

ganesh Fastival pune
याकुब मेमन कबर सुशोभीकरणावरून उदयनराजे भडकले...राजेशाही असती तर...

विसर्जन मिरवणूकीत रात्री बारा वाजेपर्यंत स्पीकर वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. आवाजाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन मंडळांनी करावे. उच्चक्षमतेचे स्पीकर किंवा आवाजाच्या पातळीची मर्यादा ओलांडल्यास आणि नागरीकांनी तक्रार आल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असे गुप्ता यांनी स्पष्ट केले.

मिरवणुकीत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास त्वरीत कारवाई केली जाईल. संभाव्य घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील ठिकाणांवर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मोबाईल हिसकावणे, मोबाईल चोरी, मुलींची-महिलांची छेड काढणे असे प्रकार रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलिसांची पथके गस्त घालणार असल्याचे आयुक्त गुप्ता यांनी सांगितले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com