याकुब मेमन कबर सुशोभीकरणावरून उदयनराजे भडकले...राजेशाही असती तर...

प्रतापगडावरील Pratapgad Fort अफजल खान कबरीबाबत Afzal Khan Tomb विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ती कबर प्रशासनाने लोकांना पाहाण्यासाठी खुली करावी, अशी मागणी उदयनराजेंनी Udayanraje Bhosale केली आहे.
MP Udayanraje Bhosale
MP Udayanraje Bhosalesarkarnama
Published on
Updated on

सातारा : अतिरेकी याकुब मेमनच्या कबरीचे सुशोभीकरण केल्यामुळे सध्या राज्यात संतापाची लाट पाहायला मिळत आहे. यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज खासदार उदयनराजे भोसले ही भडकले. ते म्हणाले, राजेशाही असती तर हे होऊनच दिलं नसतं. महाविकास आघाडीला हे सुशोभीकरण दिसलं नव्हतं का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

अतिरेकी याकूब मेमन याच्या कबरीचं करण्यात आलेल्या सुशोभीकरणाबाबत खासदार उदयनराजे भोसले यांना विचारल्यावर त्यांनी त्यांच्या स्टाईलने उत्तर दिलं. ते म्हणाले, तुम्हा लोकांनाच लोकशाही पाहिजे होती. राजेशाही असती तर हे होऊनच दिलं गेलं नसतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेने आणि भाजपने त्या विरोधात पाऊल उचलले ही चांगली गोष्ट आहे.

MP Udayanraje Bhosale
मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी फाशी दिलेल्या याकूब मेमनची कबरच विकली ! 

आधीच्या महाविकास आघाडी सरकारला हे सुशोभीकरण दिसलं नव्हतं का, असा प्रश्न देखील खासदार उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला. यावेळी प्रतापगडावरील अफजल खान कबरीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ती कबर प्रशासनाने लोकांना पाहाण्यासाठी खुली करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com