Deenanath Hospital Case : घैसास क्लिनिकमधील तोडफोड खासदार कुलकर्णींच्या जिव्हारी; भाजप शहराध्यक्षांना पत्र लिहित म्हणाल्या, कुठल्यातरी सोम्या गोम्या...

Pune Ghaisas Clinic Vandalism Medha Kulkarni BJP Letter : खासदार कुलकर्णी यांनी या पत्रातून आपली नाराजी व्यक्त करतानाच संबंधित महिला पदाधिकाऱ्यांना समज देण्याची विनंतीही शहराध्यक्ष धीरज घाटे यांना केली आहे.
Medha Kulkarni
Medha KulkarniSarkarnama
Published on
Updated on

Pune News : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर भाजपच्या काही महिला पदाधिकाऱ्यांनी घैसास क्लिनिकमध्ये तोडफोड केली होती. भाजपच्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी त्यावरून थेट भाजप शहराध्यक्षांना पत्र लिहित संताप व्यक्त केला आहे.

खासदार कुलकर्णी यांनी या पत्रातून आपली नाराजी व्यक्त करतानाच संबंधित महिला पदाधिकाऱ्यांना समज देण्याची विनंतीही शहराध्यक्ष धीरज घाटे यांना केली आहे. गर्भवतीचा मृत्यू ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. माझ्या संपूर्ण संवेदना दिवंगत मातेविषयी, तिच्या दोन अर्भकांविषयी आणि तिच्या कुटुंबीयांविषयी मी व्यक्त करते. कोणावरही असा प्रसंग येऊ नये, असे कुलकर्णी यांनी सुरूवातीला पत्रात म्हटले आहे.

Medha Kulkarni
Judges Transfer : बीड, पुण्यासह राज्यभरातील 1025 न्यायाधीशांच्या बदल्या; हायकोर्टातून निघाला आदेश...

कुलकर्णी यांच्या पत्रात काय?

दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने आपला सविस्तर खुलासा केलेला आहे, असे सांगत कुलकर्णी यांनी पत्रात म्हटले आहे की, अनामत रक्कम मागण्यात आलेली नव्हती, उलट न कळवताच नातेवाईक रुग्णाला घेऊन निघून गेल्याचे स्पष्टीकरणात म्हटले आहे. प्रसुती जोखमीची असल्याने मूल दत्तक घेण्याचा सल्ला व इतर अनेक वैद्यकीय सल्ले डावलून महिलेच्या आयुष्याशी धोका पत्करून कुटुंबीयांकडून निर्णय घेण्यात आले असे अनेक तपशील खुलाशात दिले आहेत. त्याची शहानिशा करून चूक घडली असल्यास वरिष्ठांनी योग्य ती कायदेशीर कार्यवाही करणे अपेक्षित आहे.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा यात किती दोष आहे यांची माहिती करून न घेता भाजपच्या महिला मोर्चाच्या सदस्यांनी उन्मादात जे वर्तन केले त्याबद्दल सर्वसामान्यांमध्ये प्रचंड रोष आहे. डॉ. सुश्रुत पैसास यांच्या वडिलांच्या क्लिनिकमध्ये जाऊन तोडफोड करणे हे भाजपाच्या पुणे महिला मोर्चा अध्यक्ष हर्षदा फरांदे व इतर पदाधिकाऱ्यांना निश्चितच शोभले नाही. आंदोलन करण्याच्या इतर सभ्य पद्धती आहेत ज्याचा अवलंब करणे विचारधारेला धरून ठरेल असे मला वाटते, असे कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

Medha Kulkarni
Election Duty : धक्कादायक! शिक्षकांना इलेक्शन ड्युटीमुळे परीक्षाच रद्द; विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात ढकललं...

कुठल्यातरी सोम्या गोम्या, अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊन करण्याचे काम नाही. शिवाय घैसास यांच्या वडिलांच्या हॉस्पिटलचा या घटनेची काही संबंध नसताना केलेले हे मोडतोडीचे व उर्मट कृत्य अनेकांच्या जिव्हारी लागले आहे व या संदर्भात सातत्याने परिसरातील नागरिकांचे नाराजीचे फोनही मला येत आहेत. दिल्लीतून अधिवेशनातून परत आज आल्यावर मी याविषयी अनेकांकडून माहिती घेतल्याचे कुलकर्णी यांनी पत्रात नमूद केले आहे.

सवंग प्रसिद्धीच्या मागे लागून पुढे जाण्याचे किंवा इतरही अनेक सोपे मार्ग निवडण्याचे मोह कार्यकर्त्यांनी टाळले पाहिजेत. हे समजावून सांगण्याचे कार्य पुणे शहराचे अध्यक्ष या नात्याने आपण कराल व महिला मोर्चा पदाधिकाऱ्यांना समज देऊन त्यांना आपल्या पदाचा समजदारपणे व विनम्रतेने वापर करण्यास सांगाल अशी आशा करते, अशी अपेक्षा कुलकर्णी यांनी पत्रात व्यक्त केली आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com