Dhairyasheel Mohite Patil: हर्षदारुपी दुर्गा वाईटावर विजय मिळवणारच; विधानपरिषद निवडणुकीतून हुकूमशाहीला धडा शिकवण्याची सुवर्णसंधी : धैर्यशील मोहिते-पाटील आक्रमक

Pune Graduate Constituency: अकलूजमधील महाविकास आघाडीच्या निर्धार मेळाव्यात खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी सरकारवर टीका केली. हर्षदा देशमुख-जाधव यांनी पदवीधरांसाठी रोजगार आणि मार्गदर्शन केंद्रे उभारण्याचे आश्वासन दिले.
Dhairyasheel Mohite Patil, Harshada Deshmukh Jadhav
Dhairyasheel Mohite Patil, Harshada Deshmukh JadhavSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune Graduate Election News: पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सक्षम असून हर्षदारुपी दुर्गा वाईटावर विजय मिळवणारच असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी व्यक्त केला. तसेच सत्तेच्या मस्तीत चूर असलेल्या या मनमानी आणि हुकूमशाही सरकारला आता ताळ्यावर आणण्याची वेळ आली असून, सुशिक्षित तरुणांनी निर्भीडपणे पुढे येत पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या माध्यमातून या भ्रष्ट सरकारला धडा शिकवावा, असे आवाहनही त्यांनी केले.

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार रामहरी रुपनवर, मदनसिंह मोहिते-पाटील, शीतलदेवी मोहिते-पाटील, शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, सध्या राज्यात तब्बल अकरा हजार शिक्षकांची पदे रिक्त असताना सरकार डोळे झाकून बसले आहे. माळशिरस आणि परिसरामध्ये ऊस, डाळिंब, केळी यांसारखी नगदी पिके मोठ्या प्रमाणावर होतात; मात्र या पिकांवर प्रक्रिया करणाऱ्या उपपदार्थ उद्योगांची निर्मिती करून तरुणांना स्थानिक स्तरावर उद्योजक बनवण्यासाठी हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. आगामी काळात निवडून येणाऱ्या प्रतिनिधींनी या ज्वलंत मुद्द्यांवर विधिमंडळात आवाज उठवणे गरजेचे असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.

Dhairyasheel Mohite Patil, Harshada Deshmukh Jadhav
MLC Election: भाजपचा सत्ता व संपत्तीचा माज सुशिक्षित मतदार उतरवणार, विजय आपलाच होणार : हर्षदा देशमुख-जाधव

​यावेळी बोलताना पुणे पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव यांनीही सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली. "प्रत्येक पदवीधरांच्या समस्या वेगवेगळ्या असून, हक्काचा रोजगार मिळवून देण्यासाठी स्थानिक पातळीवर मजबूत व्यवस्था उभारणे काळाची गरज आहे," असे त्या म्हणाल्या. कौशल्याधारित व व्यवसायाधारित शिक्षणाला प्रोत्साहन देण्याऐवजी हे सरकार शिक्षण संस्थांना टाळे ठोकण्याचे उद्योग करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. पदवीधरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी आपण प्रत्येक तालुक्यात रोजगार व मार्गदर्शन केंद्र उभारणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

Dhairyasheel Mohite Patil, Harshada Deshmukh Jadhav
Teachers Constituency Election: कामाच्या व्यापातच महाराष्ट्र सरकारकडून भरपगारी सुट्टीची घोषणा, खासगी कर्मचाऱ्यांना ४ तासांची सवलत!

या मेळाव्यात माजी आमदार रामहरी रुपनवर, ॲड. प्रकाश पाटील आणि शीतलदेवी मोहिते-पाटील यांनीही आपल्या परखड भाषणांतून महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिभाऊ मगर यांनी केले. महाविकास आघाडीच्या या आक्रमक भूमिकेमुळे अकलूजमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात तीव्र लाट उसळल्याचे चित्र या मेळाव्यातून दिसून आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com